उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल (फोटो- istockphoto)
उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल
निकाल दुपारी 1 वाजता पाहता येणार
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली
मुंबई/नीता परब: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.
यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.






