फोटो सौजन्य - IndianPremierLeague
RCB vs KKR Toss Update : इंडीयन प्रिमियर लिग आज रिस्टार्ट झाली आहे, तर या रिस्टार्टनंतर आयपीएल 2025 चा 58 वा सामना रंगणार आहे. हा सामना कोलकता नाइट राइडर्स विरूध्द राॅयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. बंगळुरूमध्ये सामन्याआधी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता नाणेफेक होण्यात उशीर होईल एवढेच नव्हे तर सामना सुरू होण्यास देखील आता उशीर होणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीवर आज चाहत्याची नजर असणार आहे. केकेआरसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे.
🚨 Update 🚨 The toss has been delayed due to rain. Stay tuned for further updates.#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/AQzBqFNV6M — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2025
आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी महत्त्वाचा असणार आहे. सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सच्या संघाचे आत्तापर्यंत 12 सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी पाच सामन्यात विजय मिळवला आहेत तर सहा सामना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता त्यांचे पुढील दोन सामने शिल्लक आहेत हे दोन्ही सामने त्यांना जिंकणे अनिवार्य आहे.
RCB vs KKR सामन्याला लागणार ग्रहण? सामन्यादरम्यान पाऊस पडला तर…वाचा हवामानाचा अहवाल
राॅयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या संघाचा हा 12 वा सामना असणार आहे. या सामन्यात संघाने विजय मिळवल्यास संघ प्लेऑफच्या शर्यतीत स्थान पक्के करेल. राॅयल चॅलेंजर्स बंगळूरूचा संघ सध्या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे आतापर्यत 11 सामने झाले आहेत, यामध्ये 8 सामन्यात विजय तर 3 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. जोश हेझलवुड या आजच्या सामन्यात नसणार आहे. त्यामुळे आज बंगळुरूचा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो.
आयपीएलमध्ये जर पावसामुळे सामना प्रभावित झाला किंवा उशिरा सुरू झाला तर किमान ५-५ षटकांचा सामना असणे आवश्यक आहे. जर एखाद्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि दुसरा संघ फलंदाजी करत असताना पाऊस सुरू झाला, तर दुसऱ्या संघाला सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी किमान ५ षटके खेळावी लागतील. जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ पेक्षा जास्त षटके खेळली असतील आणि नंतर पाऊस पडला तर दुसऱ्या संघालाही ५ षटके खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.
आजच्या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याला ट्रिब्युट देणार आहेत. यासाठी चाहत्यांनी आजच्या सामन्यात पांढऱ्या रंगाची जर्सी घालुन स्टेडीयममध्ये दिसणार आहेत.