भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय (फोटो- सोशल मीडिया)
अंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारत पाकिस्तान आमनेसामने
पाकिस्तानवर भारतीय संघाने मिळवला शानदार विजय
अंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत भारत जपान भिडणार
IND vs PAK Hockey Updates: अंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत आज भारत (Indian Hockey Team) आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा महामुकाबला पार पडला. आशियाई पुरुष हॉकी स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदासाठी फायनलमध्ये भारताची लढत जपानविरुद्ध होणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हॉकी सेमीफायनल पार पडली. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर दबाव ठेवला होता. भारतीय संघाने पाकिस्तानच्या बचाव फळीला खिंडार पाडले. सामन्याचा मध्यांतर होईपर्यंत भारताने या खेळावर पकड मिळवली होती.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत अभेद्य भिंतीसारख्या डिफेन्ससमोर त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. अंतिम शिट्टी वाजेपर्यंत भारताने पाकिस्तानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही आणि हॉकीच्या मैदानावर पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
𝐈𝐍 𝐂𝐀𝐒𝐄 𝐘𝐎𝐔 𝐌𝐈𝐒𝐒𝐄𝐃 𝐈𝐓… 👀🇮🇳#HockeyIndia #IndiaKaGame #U18AsiaCup2026 @imsardarsingh8 pic.twitter.com/ibc8gO6g7y — Hockey India (@TheHockeyIndia) June 5, 2026
भारतीय संघाने हॉकीच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता अंतिम सामन्यात भारतासमोर जपानचे तगडे आव्हान असणार आहे. जपानने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. भारत आणि जपान यांच्यातील हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ सध्या ज्या फॉर्मात आहे, ते पाहता टीम इंडिया सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.
भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात कझाकिस्तानवर १३-० अशा दणदणीत विजयाने केली. त्यानंतर जपानविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला, मात्र त्या पराभवातून धडा घेत संघाने शानदार पुनरागमन केले. कोरियाला ४-१ ने नमवल्यानंतर भारतीय संघाने चायनीज तायपेईचा १३-१ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने आतापर्यंत ३२ गोल केले असून केवळ ६ गोल स्वीकारले आहेत.






