फोटो सौजन्य : ICC
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ चा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये सुरू आहे. काल या सामन्याचा पहिला दिवस पार पडला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली. भारताच्या संघाला आठ सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवायचा होता आणि फायनलमध्ये स्थान पक्के झाले असते पण भारताच्या संघाला फक्त एक सामन्यात विजय मिळाला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली आणि फायनलमध्ये स्थान पक्के केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या फायनलच्या सामन्यामध्ये कोण विजय मिळणार हे पुढील दोन दिवसांमध्ये कळणार आहे. त्याआधी आता आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पुढील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यामध्ये कोणते संघ हे कोणत्या संघांविरुद्ध खेळणार यासंदर्भात माहिती देण्यात आले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या या सायकलमध्ये कोणत्या संघ कोणत्या संघांशी खेळणार आहेत, संघाचे कोणते सामने घरच्या मैदानावर होणार आणि कोणते मालिका या बाहेरील मैदानावर होणार या संदर्भात आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या या शर्यतीमध्ये नऊ संघांना स्थान मिळाले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, वेस्टइंडीज, पाकिस्तान, न्युझीलँड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ खेळणार आहेत. या सायकलमध्ये प्रत्येक संघ हा सहा मालिका खेळणार आहे. ज्यामध्ये तीन मालिका या घरच्या मैदानावर खेळल्या जाणार आहेत तर तीन मालिका या विरोधी संघांच्या मैदानावर खेळवल्या जाणार आहेत.
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर अपडेट! मालिकेआधी भारतीय संघाच्या अडचणीमध्ये होणार वाढ? वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर इंग्लंड न्यूझीलंड आणि बांगलादेश या तीन संघांविरुद्ध खेळणार आहे. तर विरोधकांच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघ हा भारत वेस्टइंडीज आणि साऊथ आफ्रिका यांच्याविरुद्ध खेळणार आहे. भारताचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध खेळणार आहे, तर विरोधकांच्या न्युझीलँड, इंग्लड आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध होणार आहे.
ऑस्ट्रेलिया –
घरच्या मैदानावर – न्युझीलँड, इंग्लंड, बांगलादेश
दुर – इंडिया, वेस्ट इंडीज, साऊथ आफ्रिका
बांगलादेश –
घरच्या मैदानावर – इंग्लंड, वेस्टइंडीज, पाकिस्तान
दुर – ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका
इंग्लंड –
घरच्या मैदानावर – न्यूझीलंड, इंडिया, पाकिस्तान
दुर – ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, बांगलादेश
भारत –
घरच्या मैदानावर – ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, साऊथ आफ्रिका
दुर – न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका
न्युझीलँड –
घरच्या मैदानावर – इंडिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका
दुर – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान
पाकिस्तान –
घरच्या मैदानावर – न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका
दुर – इंग्लंड, वेस्टइंडीज, बांगलादेश
साऊथ आफ्रिका –
घरच्या मैदानावर – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश
दुर – इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका
श्रीलंका –
घरच्या मैदानावर – इंडिया, साउथ आफ्रिका, बांगलादेश
दुर – न्युझीलँड, वेस्टइंडीज, पाकिस्तान
वेस्टइंडीज –
घरच्या मैदानावर – ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका
दुर – न्यूझीलंड, भारत, बांगलादेश