ICC Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा कोच दुबईतून अचानक मायदेशी; सोडावा लागला चॅम्पियन्स ट्रॉफी दौरा
Morne Morkel Father Death News : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अगदी आधी, भारतीय संघ एका भयानक समस्येचा सामना करीत आहे. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले आहे. ज्यामुळे त्यांना दुबईहून दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या घरी परतावे लागले. भारतीय संघ दुबईत उतरल्यानंतर दोन दिवसांनी ही बातमी आली. एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, मोर्ने मॉर्केल आफ्रिकेला परतला आहे, परंतु तो कधी परतणार याबद्दल कोणतीही अपडेट नाही.
बुमराहसुद्धा खेळणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफी
जेव्हा भारतीय संघ सरावासाठी आला तेव्हा मॉर्केल संघासोबत नव्हता, परंतु १६ फेब्रुवारी रोजी तो संघासोबत दिसला. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर असल्याने मॉर्केलची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरली आहे. मोहम्मद शमी निश्चितच संघाचा भाग झाला आहे, पण तोही १४ महिन्यांनंतर दुखापतीतून बरा होऊन परतला आहे. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना एकदिवसीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे मॉर्केलचे मायदेशी परतणे टीम इंडियासाठी कोणत्याही समस्येपेक्षा कमी नाही.
मोर्ने मार्केलच्या वडिलांचे निधन
🚨INDIA'S BOWLING COACH MORNE MORKEL HAS LEFT FOR SOUTH AFRICA FROM DUBAI🚨
– It has been reported that he had to rush back home due to a family emergency
– He was with the team in Dubai for preparations for the Champions Trophy 2025.#ChampionsTrophy2025#TeamIndia #Cricket pic.twitter.com/H7KNPX83vI
— DEEP SINGH (@TheAllr0under) February 18, 2025
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मॉर्ने मॉर्केलने भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये सध्या मॉर्केल, अभिषेक नायर आणि रायन टेन डोइशेत यांचा समावेश आहे. तर टी दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम आहेत. अलिकडेच, सीताशु कोटक टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आहेत.
भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी
२०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होत असली तरी, टीम इंडियाचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध असेल. दुसरा सामना २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाईल आणि त्यानंतर भारत २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळेल.