फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला विश्वचषकाचा सामना : आयसीसी महिला विश्वचषक 2025 चे आयोजन भारत करणार आहे, या स्पर्धेला सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत. भारताच्या संघाने मागील काही मालिकामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे आयोजित केला जाणार आहे. हा सामना भारतीय महिला संघासाठी महत्वाचा असणार आहे, टीम इंडिया या सामन्यामध्ये विश्वचषकाची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्यात असेल. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
उद्या म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी सामन्याआधी आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी श्रेया घोषाल ही या कार्यक्रमाला खास परफॉर्मन्स करणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात ही भारत आणि श्रीलंका या सामनाने होणार आहे. महिला विश्वचषक २०२५ चा पहिला सामना मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता होईल.
A billion hearts rise with Team India! 🇮🇳 1 DAY TO GO! Drop a 💙 & say it loud – #BelieveInBlue! 🙌#CWC25 👉 #INDvSL | TUE, SEP 30, 2 PM on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/Qbk5AbpCKG — Star Sports (@StarSportsIndia) September 29, 2025
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहू शकतात. तुम्ही विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये समालोचनासह सामने पाहू शकता. स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतातील जिओ हॉटस्टार अॅपवर मिळू शकते.
भारताच्या पुरुष संघाने नुकताच आशिया कप 2025 जिंकला आता भारताच्या महिला संघाला त्याच्या घरच्या मैदानावर ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना ही कमालीच्या फाॅर्ममध्ये आहे. तिने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे आता ती विश्वचषकामध्ये उपकर्णधार म्हणून कशी कामगिरी करणार आहे याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.