भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच आक्रमक असतो. त्याला समोरच्या खेळाडूची कोणतीही गोष्टी न पटल्यास तो अनेकदा आक्रमकपणे त्या गोष्टीला प्रतिउत्तर देतो. क्रिकेट विश्वात अँग्री यंग मॅन अशी ख्याती असणारा विराट कोहली मागील अनेक काळापासून मात्र त्याच्या फॉर्मा बाहेर आहे. अनेक सामन्यात तो चांगली कामगिरी करू शकला नाही. अशातच सध्या सुरु असलेल्या आशिया कप मध्ये पुन्हा फॉर्मात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशातच अँग्री यंग मॅन अशी ख्याती असणारा विराट मात्र काल झालेल्या भारत हाँगकाँग सामन्या दरम्यान एका खेळाडू समोर झुकून नतमस्तक झाला.
भारत आणि हाँगकाँग यांच्यामध्ये 31 ऑगस्टला झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) त्याच्या दमदार खेळाच्या बळावर विराट कोहलीला त्याच्यासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडले. सूर्यकुमार यादवने या मॅचमध्ये तुफानी खेळी करून प्रत्येकाला आठवण करून दिली की, तो भारताचा नंबर ४ फलंदाज का आहे.
Should we bow?
Y̶e̶s̶,̶ ̶h̶e̶’̶s̶ ̶a̶ ̶k̶i̶n̶g̶ Yes, the King himself does!DP World #AsiaCup2022 #BelieveInBlue #SuryakumarYadav #INDvHK #INDvHKG #ViratKohli #KingKohli pic.twitter.com/IDmxM0Z8Fu
— Star Sports (@StarSportsIndia) August 31, 2022
सूर्यकुमारने हाँगकाँग विरुद्ध फक्त २६ बॉलमध्ये ६८ रन काढले, आणि त्या बळावर भारताने ही मॅच ४० रनांनी सहज जिंकत सुपर ४ मध्ये प्रवेश केला. या मॅचमध्ये सूर्यकुमारने केलेल्या ३६० डिग्री बॅटिंगने जगाचे लक्ष वेधलंच, पण या वेळी विराट कोहलीने जे काही केलं, त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. या निमित्ताने कोहली कधीही चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यापासून मागे हटत नाही, हे देखील पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण हाँगकाँगविरुद्ध बॅटिंग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. मात्र, सूर्यकुमारच्या खेळीमुळे भारताला सन्मानजनक स्कोअर उभारता आला. सूर्याने सहा सिक्स आणि सहा फोरच्या बळावर अर्धशतक झळकावले.