रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या शानदार १२१ धावांच्या जोरवार ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात आपले वर्चस्व प्रस्थापित करून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि समीक्षकांना प्रभावित करून सोडले. पर्थमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील कमकुवत कामगिरीनंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. सलग दोन अर्धशतके झळकावत रोहितने आपली क्षमता सिद्ध केली.
सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात, हिटमॅनने सुरवातीला देखील संथ पण संयमी खेळी खेळली आणि त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहितने १२५ चेंडूत १२१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारले. या खेळीसह त्याने एक विक्रम देखील रचला आहे.
हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘हिटमॅन’ शो! ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे शानदार शतक
या खेळीदरम्यान, रोहित शर्माने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५०० धावा पूर्ण केल्या, हा पराक्रम करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, फक्त सचिन तेंडुलकरच्या नावे ही कामगिरी जमा होती. ७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित केलेली ही कामगिरी त्याच्या मजबूत आणि सातत्यपूर्ण कामगिरीची साक्ष ठरली आहे. सध्या, सक्रिय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ३०७७ धावा केल्या आहेत, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव करून मालिकेचा शेवट गोड केला आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावा केल्या होत्या. तर प्रतिउत्तरात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले २७३ धावांचे लक्ष्य सहज गाठले. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी सुटली.
भारताची पहिली विकेट ६९ धावांवर पडली. शुभमन गिल २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने १६८ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि भारताचा विजय निश्चित केला. रोहितने कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक झळकवले. त्याने १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा काढल्या. यामध्ये त्याने १३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर विराट कोहलीने ८१ चेंडूचा सामना करत नाबाद ७४ धावा केल्या. या खेळीत कोहलीने ७ चौकार लागवले.
हेही वाचा : IND VS AUS: सिडनीत Rohit Sharma चे ‘डबल’ शतक! ODI क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ खास टप्पा






