जो रूट(फोटो-सोशल मीडिया )
Joe Root creates history at Lord’s : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.या सामन्यात जो रूटने इतिहास रचला आहे. रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा केल्या असून याबरोबर तो आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे. गेल्या ९३ वर्षात ३०० हून अधिक खेळाडूंनी भारताविरुद्ध कसोटी सामने खेळले आहेत, परंतु ३४ वर्षीय इंग्लिश फलंदाज जो रूट भारतीयन संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये किमान ३००० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा : Ind vs Eng 3rd Test : लाईव्ह सामन्यात भारताला मोठा झटका! ऋषभ पंतला दुखापत; सोडावे लागले मैदान..
इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रूटला भारताविरुद्ध ३००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी ४५ धावांची गरज होती. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ४४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नितीश रेड्डीच्या चेंडूवर चौकार लगावून त्याने हा टप्पा गाठला आणि इतिहास रचला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळी जात सून यातील तिसरा सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. भारताविरुद्ध जो रूट ३३ वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने १३ डिसेंबर २०१२ रोजी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताविरुद्ध इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात १० शतके आणि १२ अर्धशतके झळकावली असून आपला दबदबा सिद्ध केला आहे.
जो रूटनंतर, ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग भारताविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पॉन्टिंगने भारताविरुद्ध २९ कसोटी सामने खेळले असून या दरम्यान त्याने एकूण २५५५ धावा केल्या आहेत. एकूण ८ फलंदाजांनी भारताविरुद्ध २००० पेक्षा जास्त कसोटी धावा फाटकावल्या आहेत. यामध्ये रूट, पॉन्टिंग, अॅलिस्टर कुक, स्टीव्ह स्मिथ, क्लाइव्ह लॉयड, जावेद मियांदाद, शिवनारायण चंद्रपॉल आणि मायकेल क्लार्क या दिग्गजांचा समावेश आहे.
हेही वाचा : IND w VS AUS w : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर; राधा यादवकडे संघाची धुरा
खेळाडू संघ सामने धावा सर्वोत्तम धावसंख्या शतक/अर्धशतक
जो रूट इंग्लंड ३३* ३००१* २१८ १०/१२
रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलिया २९ २५५५ २५७ ८/१२
अॅलिस्टर कुक इंग्लंड ३० २४३१ २९४ ७/९
स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया २४ २३५६ १९२ ११/५
क्लाइव्ह लॉईड वेस्ट इंडिज २८ २३४४ २४२* ७/१२
जावेद मियांदाद पाकिस्तान २८ २२२८ २८०* ५/१४
शिवनारायण चंद्रपॉल वेस्ट इंडिज २५ २१७१ १४० ७/१०
मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलिया २२ २०४९ ३२९* ७/६