ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Eng 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून इंग्लंडचे फलंदाज मैदानात आहेत. सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंडचे दोन गडी बाद झाले आहेत. तर जो रुट आणि ऑली पॉप क्रीजवर खेळत आहेत. अशातच सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली असून तो मैदानावर बाहेर गेला आहे. त्याच्या जाग ध्रुव जुरेलला विकेटकीपिंगसाठी उतरावे लागले.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने डावातील ३४ वे षटक टाकले. या षटकातील पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता, जो यष्टिरक्षक पंतने डावीकडे उडी घेत थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात तो अयशस्वी ठरला आणि चेंडू सीमेपर्यंत गेला. तथापि, पुढच्याच क्षणी पंत वेदनेने विव्हळत होता.प्रत्यक्षात, डायव्हिंगमुळे त्याच्या डाव्या हाताचे बोट मुरगळल्याने त्याला वेदना होऊ लागल्या.
हेही वाचा : IND w VS AUS w : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर; राधा यादवकडे संघाची धुरा
हा सर्व प्रकार घडला तेव्हा तात्काळ टीम इंडियाचे डॉक्टर मैदानात आले आणि त्यांनी पंतला ‘मॅजिक स्प्रे’ लावून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पंतने पुन्हा विकेटकीपिंग सुरू केले. मात्र, या काळात तो वेदनेमध्ये दिसून आला पंतने त्या षटकातील उर्वरित ५ चेंडूंमध्ये विकेटकीपिंग देखील केले परंतु ओव्हर संपताच त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला, अशा परिस्थितीत पंतच्या जागी ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक म्हणून खेळवण्यात आले आहे.
दुसरीकडे, पंत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाताच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील उठले आणि पंतच्या प्रकृतीची विचारपूस करायाला गेले. पंतची दुखापत किती गंभीर आहे आणि तसेच त्याला रुग्णालयात जाण्याची गरज आहे की नाही याबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नाही. माहिती दिलेली नाही.
भारत आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटीसाठी लॉर्ड्स मैदानावर आमनेसामने आले आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लडकडून सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट मैदानात फलंदाजी करण्यास उतरले. इंग्लंडची सुरवात खराब झाली. ४४ धावांवर इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. बेन डकेटच्या रूपात इंग्लंडला पहिला झटका बसला. त्याला २३ धावांवर नितेश कुमार रेड्डीने माघारी पाठवले. तर त्याच्या सहकारी सलामीवीर जॅक क्रॉलीला देखील नितेश कुमारने १८ धावांवर केले. त्यानंतर मैदानात जो रूट आणि ऑली पॉप यांनी इंग्लंडचा डाव सावरला. रूटने(५२) आपले अर्धशतक पूर्ण केले तर पोप ४३ धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाज धावा देत नसले तरी त्यांना विकेट काढण्यात मात्र अडचण येत आहे.