फोटो सौजन्य – X (BCCI)
भारताचा संघ सध्या इंग्लडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे, या मालिकेचा तिसरा सामना हा लाॅर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या तिसऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघामध्ये टशनबाजी पाहायला मिळाली. दोन्ही संघाच्या खेळाडूमध्ये वाद देखील पाहायला मिळाला. त्याचबरोबर भारताच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये इंग्लडच्या संघाला लवकर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंचे रिएक्शन फारच तीव्र होते. आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला त्याच्या रिएक्शनची मोठी भरपाई करावी लागणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे, परंतु शेवटच्या दिवसाच्या खेळाच्या काही तास आधी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर मोठा दंड ठोठावला आहे. इंग्लंडच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने एक कृत्य केले. यासाठी आयसीसीने त्याच्यावर दंड ठोठावला आहे. मोहम्मद सिराजच्या सामन्याच्या फीच्या १५ टक्के रक्कम वजा केली जाईल. याशिवाय त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
🚨Mohammed Siraj fined 15% match fee, handed one demerit point for Ben Duckett send-off on Day 4 at Lord’s. #ENGvIND pic.twitter.com/cYiFFf9Kuh
— Cricbuzz (@cricbuzz) July 14, 2025
आयसीसीने माहिती दिली आहे की, रविवारी लॉर्ड्स येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजला आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे. यामुळे, त्याला त्याच्या सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सिराजने खेळाडू आणि खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे, जे “आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाहेर असताना अपशब्द, कृती किंवा हावभाव वापरणे किंवा आक्रमक प्रतिक्रिया भडकवणे” याशी संबंधित आहे.
IND vs ENG 3rd Test : पावसामुळे भारताचं स्वप्न अपुरे राहणार? कसे असणार 5 व्या दिवशी हवामान
याशिवाय, सिराजच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे, जो २४ महिन्यांच्या कालावधीत त्याचा दुसरा गुन्हा होता, ज्यामुळे २४ महिन्यांच्या कालावधीत त्याचे डिमेरिट पॉइंट दोन झाले आहेत. सिराजला त्याचा शेवटचा डिमेरिट पॉइंट ७ डिसेंबर २०२४ रोजी अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मिळाला.
रविवारी इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सहाव्या षटकात ही घटना घडली, जेव्हा मोहम्मद सिराजने सलामीवीर बेन डकेटला बाद केल्यानंतर बाद झालेल्या फलंदाजाच्या जवळ येऊन खूप जोमाने सेलिब्रेशन केले. सिराजने आपला गुन्हा कबूल केला आहे. अशा परिस्थितीत, आता त्याच्याविरुद्ध कोणतीही सुनावणी होणार नाही. जर २४ महिन्यांच्या आत तुमच्या डिमेरिट खात्यात चार पॉइंट जोडले गेले तर तुम्हाला एक कसोटी, दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते.