फोटो सौजन्य – X (BCCI Women)
IND Women vs ENG women 2nd T20: भारतीय महिला संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, टीम इंडीयाची इंग्लडविरुद्ध पाच सामन्याची T20 मालिका सुरु आहे. या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला होता. आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याचबरोबर ५ सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. हरमनप्रीत कौर पहिल्या सामन्यात खेळली नाही त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व स्मृती मंधाना करत होती. तिने पहिल्याच सामन्यात तिच्या नावावर शतक केले आणि भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याच यश मिळाले.
महिला विश्वचषक 2025 सुरू व्हायला फक्त काही महिने शिल्लक राहिले आहेत याआधी भारताच्या संघासाठी सुरू असलेले इंग्लंड मधील सामने हे नक्कीच फायदेशीर ठरतील. या विश्वचषकाच्या आयोजन भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे त्यामुळे भारतीय महिला संघाला याचा फायदा होऊ शकतो.
Shreyas Iyer आणि आई याच्यात झाला वर्ल्ड कप सामना! पहा इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा सामना हा ब्रिस्टॉल काउंटी ग्राउंड येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ११ वाजता होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे सामन्याच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच 10.30 मिनिटांनी होणार.
Let’s Play 🏆 🤝
Updates ▶️ https://t.co/iZwkYt8agO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/VH4oWKUCYw
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री सुरु होणार आहे. भारतामध्ये महिला टीम इंडीयाचा सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग हे सोनी लिव्ह अॅपवर पाहायला मिळणार आहे.