सौजन्य - BCCI भारतीय संघासाठी कठीण परिस्थिती सरफराज खानच्या शानदार 150 धावा
IND vs NZ 1st Test : बंगळुरुला सुरू असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाला अवघ्यचा 46 धावांत गुंडाळले. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने धमाकेदार खेळी करीत 402 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने अद्वितीय खेळी करीत न्यूझीलंडला आतापर्यंत 70 धावांची लीड दिली आहे.
शतकी खेळीनंतर सरफराजचे दमदार सेलिब्रेशन
🎥 WATCH Maiden Test Ton: Super Sarfaraz Khan's scintillating 150(195) 👌👌#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank — BCCI (@BCCI) October 19, 2024
कर्णधार रोहित शर्माची विकेट तर अविश्वसनीय पद्धतीने
टीम इंडियाकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वीने चांगली सुरुवात केली. परंतु, एजाज पटेलने भेदक गोलंदाजीच्या जोरावर सलामी जोडी तंबूत पाठवली. कर्णधार रोहित शर्माची विकेट तर अविश्वसनीय पद्धतीने गेली. त्यानंतर खरे क्रिकेट मैदानात उतरले. सरफराज खान आणि विराट कोहली महत्त्वपूर्ण भागीदारी करीत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. विराट अगदी तिसऱ्या दिवसाच्या अंतिम सत्रात अगदी शेवटच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर बाद झाला.
मैदानाच्या चौफेर टोलेबाजी
आजचा दिवस सरफराजने गाजवला, सकाळपासूनच सरफराजने मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करीत दमदार शतक ठोकले. शतक ठोकल्यानंतर न्यूझीलंडने गोलंदाजीत परिवर्तन करीत वेगवान गोलंदाजांना बाहेर काढले त्यानंतर सरफराजला खेळताना अडचणी आल्याचे पाहायला मिळाले. सरफराजने 150 धावांचा टप्पा पार केल्यानंतर टीम साउथीने सरफराज अलगद टीपले. अशा तऱ्हेने एक मोठी इनिंग समाप्त झाली.