सौजन्य - indiancricketteam चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड करताना सिलेक्टर्सला फुटणार घाम, वेगवान गोलंदाजांचे निकष वाढणार डोकेदुखी
IND vs NZ 3rd Test 1st Day : आज वानखेडेवर फिरकीची जादू चालली. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनकच झाली. त्यांची पहिली विकेट कॉन्वेच्या रूपाने लवकरच गेली, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार टॉम लॅथमला क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रचिन रवींद्रलासुद्ध वॉशिंग्टनने सेम बॉल टाकून त्रिफळाचित केले. त्यानंतर चालली रविंद्र जडेजाची जादू, आज जड्डूने 5 विकेट घेत किवींना जेरीस आणले.
टीम इंडियाला निश्चितच विजयासाठी खेळावे लागणार
वानखेडेच्या ऐतिहासिक स्टेडियमवर सुरू असलेल्या या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला निश्चितच विजयासाठी खेळावे लागणार आहे, कारण WTC फायनलचे गणित जुळवण्यासाठी भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल. वानखेडेच्या पिचवर प्रथम फलंदाजी करणारा संघ सर्वाधिक विजयी झालेला आहे. तसेच, जसजसा वेळ जातो वानखेडेची पिच स्पीनर्सला खूप फायदा करते. फिरकीपटूंचा या पिचवर मोठा दबदबा आहे. आज भारताने नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते, परंतु यावेळीसुद्धा नशीबाने भारताला साथ दिली नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
किवींचा संघ 235 धावांवर गारद
फिरकीला अनुकूल पिच
वानखेडेच्या खेळपट्टीवर फलंदाज मोठ्या प्रमाणात धावा करतात. तसे, पाहता प्रथम फलंदाजी करण्याऱ्याला या पिचवर फायदा होतो. परंतु, यावेळेला फिरकीला अनुकूल पिच तयार करण्याची मागणी केली होती. तसेच, काहीसे चित्र आजच्या खेळावरून दिसले. मोहम्मद सिराज आणि आकाशदीप या ओपनर गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात केली. परंतु, कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर काढले.
भारताच्या ओपनर गोलंदाज आकाशदीप याला अगदी लवकर यश मिळाले. त्याने डेव्हीड कॉन्वेला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने वॉशिंग्टन सुंदरला बाहेर काढले आणि रोहित निर्णय यशस्वी झाला. वॉशिंग्टन सुंदरला खेळपट्टीची चांगली साथ मिळाल्याचे पाहायला मिळाले. वॉशिंग्टन सुंदरने लागलीच न्यूझीलंडचा कर्णधार टॅाम लॅथमला क्लिन बोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडचा दुसरा स्टार फलंदाज रचिन रविंद्रला लागलीच पुन्हा एकदा क्लिन बोल्ड केले. न्यूझीलंडच्या तीन विकेट गेल्या तोपर्यंत मध्यान्हपर्यंत पहिले सेशन संपले होते. लंच टाईम पर्यंत किवींनी 3 विकेट गमावून 145 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या सत्रात रोहितने रविंद्र जडेजाला बाहेर काढले आणि जड्डूने करून दाखवले. जड्डूच्या चेंडूला चांगलेच स्पीन मिळत होते. राईट हॅंडच्या फलंदाजांसाठी लेफ्ट आर्म गोलंदाजांने लेगस्पीनने सेट बॅट्समन विल यंगला रोहित शर्माद्वारे झेलबाद केले. त्यानंतर लगेचच टॉम ब्लंडेलला त्रिफळाचित केले. काही अंतराने लगेच ग्लेन फिलिप्सदेखील जड्डूच्या गोलंदाजीवर फसला आणि क्लिन बोल्ड झाला. चहापानानंतरदेखील रविंद्र जडेजाच गोलंदाजी करीत होता. रविंद्र जडेजाने सर्वाधिक ओव्हर्स टाकल्या. आज जड्डूने त्याचा महत्त्वपूर्ण परफॉर्मन्सने भारतीय संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले. अन्यथा जर यापैकी काही फलंदाज टिकले असते तर भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरली असती.
चहापानानंतर रवींद्र जडेजाने इश सोढीला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या मॅट हेन्रीला रवींद्र जडेजाने क्लिन बोल्ड करीत पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. दुसऱ्या सत्रात आलेल्या जड्डूने आज सर्वाधिक विकेट घेत भारताला चांगले यश मिळवून दिले. रवींद्र जडेजाने आज 5 विकेट घेतल्या.
अगदी उन्हाच्या तडाख्यात रविंद्र जडेजाने महत्त्वाची विकेट घेतल्या. पूर्ण सेट असलेल्या विल यंगला बाद करीत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. या खेळपट्टीवर फिरकीपटूला आणखी फायदा होणार आहे. जस जसा वेळ जाईल तसे पिच आणखी ड्राय होणार आहे आणि त्यामुळे स्पीनरला खूप फायदा होणार आहे. पहिल्याच दिवशी फिरकीला चांगली साथ मिळत असल्याने अजून आणखी काही दिवसांनी स्पीनर्सला मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे.