फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस असणार आहे. काल पहिल्या दिनीं न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या भारताच्या संघाने न्यूझीलंडला २३५ धावांवर सर्वबाद केले आणि सध्या टीम इंडिया सामन्यात फलंदाजी करत आहे. भारताचा फिरकीपटूंची कमाल काल वानखेडे स्टेडियमवर पाहायला. ९ विकेट्स फिरकीपटुंच्या नावावर राहिले. यामध्ये रवींद्र जडेजाने ५ विकेट्स घेतले तर ४ विकेट्स वॉशिंग्टन सुंदरने घेतले आणि एक विकेट आकाशदीपच्या नावावर राहिला. पहिल्याच भारताच्या संघाने न्यूझीलंड पहिल्या इनिंगमध्ये सर्व फलंदाजांना बाद केल्यामुळे सध्या मैदानावर टीम इंडिया फलंदाजी करत आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीलाच त्याची विकेट गमावली. त्यानंतर भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने स्वतः विकेट्स गमावला.
Stumps on the opening day of the Third Test in Mumbai.#TeamIndia move to 86/4 in the 1st innings, trail by 149 runs.
See you tomorrow for Day 2 action
Scorecard – https://t.co/KNIvTEyxU7#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ppQj8ZBGzz
— BCCI (@BCCI) November 1, 2024
शेवटच्या काही ओव्हर शिल्लक होत्या त्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीसाठी मोहम्मद सिराजला फलंदाजीसाठी पाठवले होते. परंतु सिराज पहिल्याच चेंडूंमध्ये बाद झाला. त्यानंतर भारताचा अनुभवी फलंदाजी विराट कोहली मैदानावर आला आणि संघासाठी त्याने फक्त ४ धावा केल्या आणि बाद झाला. सध्या मागील काही महिन्यांपासून विराट कोहली भारतीय क्रिकेटसाठी फार चांगली कामगिरी करू शकला नाही. सध्या मैदानावर आता शुभमन गिल आणि रिषभ पंत टिकून आहेत. शुभमन गिल संघासाठी पहिल्या दिनाच्या शेवटपर्यत ३८ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या आहेत तर रिषभ पंतने फक्त १ चेंडू खेळला आहे.
हेदेखील वाचा – IND vs NZ Live Update : रवींद्र जडेजाची तिसऱ्या सामन्यात विकेटची हॅट्रिक! फिरकीपटूंनी केली कमाल
प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात विशेष झाली नाही. संघाला पहिला धक्का चौथ्या षटकात १५ धावांवर बसला, जेव्हा डेव्हॉन कॉनवे ४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर न्यूझीलंडचा डाव सावरला आणि संघाला दुसरा धक्का कर्णधार टॉम लॅथमच्या रूपाने १६व्या षटकात ५९ धावांवर बसला, जो ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर संघाला ७२ धावांवर तिसरा धक्का बसला आणि त्यानंतर १५९ धावांवर चौथा आणि पाचवा धक्का बसला. त्यानंतर १८७ धावांवर संघाला सहावा धक्का बसला. यानंतर संघाने २१० धावांवर सातव्या आणि आठव्या विकेट्स गमावल्या. पुढे जाताना संघाने २२८ धावांवर नववा विकेट आणि त्यानंतर २३५ धावांवर १०वी आणि शेवटची विकेट गमावली. अशाप्रकारे किवी संघ २३५ धावांवर बाद झाला.
न्यूझीलंडसाठी सर्वात मोठी भागीदारी डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी केली. दोघांनी ८७ धावा (१५१ चेंडू) जोडल्या. याशिवाय संघासाठी इतर एकाही फलंदाजाला ५० धावांची भागीदारीही करता आली नाही.
भारतीय गोलंदाजांनी कहर केला
भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ बळी घेतले. यादरम्यान जड्डूने २२ षटकात ६५ धावा दिल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने ४ विकेट्स घेतल्या. या काळात सुंदरने १८.४ षटकात ८१ धावा दिल्या. उर्वरित एक विकेट आकाशदीपने ५ षटकात २२ धावा देऊन घेतली.