फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सध्या दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचा संघ डगमगला आहे. तिसरा कसोटीच्या दुसऱ्या दिनी भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचे नऊ विकेट्स घेतले आहेत. सध्या सामन्यात दुसऱ्या दिनाच्या शेवटपर्यंत 143 धावांची आघाडी घेतली आहे. आज काही वेळातच या सामन्याचा तिसरा दिनाची सुरुवात होणार आहे. यासाठी भारताच्या संघाला फक्त शेवटचा एक विकेट घ्यायचा आहे. त्यानंतर भारताचा संघ दुसऱ्यांच्या फलंदाजीसाठी येईल. मागील दोन सामने गमावल्यानंतर भारताच्या संघाने दमदार कमबॅक या मालिकेमध्ये केला आहे. परंतु पहिले दोन सामने न्यूझीलंड संघाला जिंकल्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही मालिका न्यूझीलंडचा संघ जिंकेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारताच्या संघाला पुढील सर्व कसोटी सामने जिंकणे फार गरजेचे आहे. सध्या भारताचा संघ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर आहे. परंतु पुढील सामने हे भारताचे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी खेळवले जाणार आहेत. यासाठी भारताच्या संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या संघासाठी विजय मिळवणे सोपे नसणार आहे.
22 नोव्हेंबरपासून होणार आहेत, यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये भारताच्या 18 खेळाडूंचा संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना सुद्धा संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहम्मद शामी अजूनपर्यंत त्याच्या दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामने खेळणार आहे. ट्रॉफीसाठी भारताचा संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये त्यांनी 235 धावांची खेळी खेळली. त्यानंतर पहिल्या रिंग मध्ये भारताच्या संघाने 262 धावा केल्या आणि काही वेळासाठी भारताच्या संघाने सामन्यांमध्ये भावांच्या आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिनाच्या शेवटपर्यंत भारताच्या गोलंदाजांनी कमालीशी कामगिरी करत नऊ विकेट्स मिळवले आहे. यामध्ये फक्त एक विकेट हवा आहे आणि त्यानंतर भारताच्या संघासमोर न्यूझीलंडचे धावांचे आव्हान असणार आहे आणि ते धावांचे आव्हान पार केल्यास भारताचा संघ वानखेडेवर या मालिकेचा पहिला विजय मिळवेल.
तिसऱ्या कसोटीत भारताच्या संघाने दोन मोठे बदल केले यामध्ये एक भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघाबाहेर ठेवण्यात आले. त्याचबरोबर केएल राहुलने संघामध्ये पुनरागमन केले होते परंतु मागील दोन सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी करू शकणार नाही त्यामुळे त्याला पुन्हा सांगा बाहेर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या जागेवर आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीवर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे. कारण मागील दोन सामन्यांमध्ये भारताच्या संघाची फलंदाजीमुळेच भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. काही फलंदाजाने चांगली कामगिरी केली परंतु ते भारतीय संघाला विजय मिळवू देऊ शकले नाही. विराट कोहलीच्या खराब फॉर्ममुळे तो या मालिकेत फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही त्याचबरोबर रोहित शर्मा सुद्धा फक्त एका सामनात अर्धशतक झळकावले होते. शेवटच्या इनिंगमध्ये टीम इंडिया विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल.