क्रिकेट स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd match weather report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात ये असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक 2026 च्या पार्श्वभूमीवर , प्रत्येक सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी भारतीय संघ नऊ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन खेळाडूंची शक्य तितकी चाचपणी करून घेत आहे. दरम्यान, चाहत्यांची सर्वात मोठी चिंता सतावत आहे, ती म्हणजे सामन्याच्या दिवशी हवामान कसे असणार आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.
दुसऱ्या T20 दरम्यान हवामान पूर्णपणे क्रिकेटसाठी अनुकूल राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 11 डिसेंबर रोजी मुल्लानपूरमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे आणि आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिवसाचे कमाल तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, वाऱ्याचा वेग ताशी सुमारे 9 किलोमीटर असणार आहे. तर स्वच्छ हवामानामुळे सामना विस्कळीत होण्याची शक्यता फारच कमी आहे. संध्याकाळी हलके दव पडणार आहे. परंतु, सुरुवातीचे दव फलंदाजांना फारसे त्रास देणार नसून दुसऱ्या डावात खरे आव्हान असणार आहे. जेव्हा गोलंदाजांना चेंडूवर पकड निर्माण करण्यास अडचणी येऊ शकतात. हे पहिल्या टी-२० मध्ये देखील पहायाल मिळाले होते.
दुसऱ्या टी २० सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी 6.30 वाजता नाणेफेक करण्यात येईल. टी-२० सामन्यांमध्ये नाणेफेक ही सहसा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचा थेट परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे. नाणेफेक जिंकणारा संघ अनेकदा प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय स्वीकारतो. ज्यामुळे दव पडल्यावर फलंदाजांना लक्ष्याचा पाठलाग अधिक सोपे होऊन जाते. दुसऱ्या डावात ओला चेंडू फिरकीपटूंसाठी विशेष अडचणी निर्माण करतो आणि यॉर्कर आणि स्लोअर चेंडूंवरील पकड देखील गमावण्याची शक्यता. म्हणून, कर्णधार त्यांची रणनीती आखताना नणेफेकीचा हा घटक लक्षात ठेवणार आहेत.
हेही वाचा : ‘मी रिस्क घेईन, तू खेळत रहा…” स्वत:चे करियर धोक्यात घालणाऱ्या रोहित शर्माबद्दल यशस्वी जयस्वालचा मोठा खुलासा
दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग ११
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, देवाल्ड ब्रुविस, डोनोवन फरेरा, मार्को जानसेन, लुथो सिपामला, अँरिच नोर्टजे, लुंगी एनगिडी, केशव महाराज.






