भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका : सध्या टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबरपासून भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामान्यांची मालिका असणार आहे. भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणार आहे. यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघानी टीमची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. भारताचा T२० फॉरमॅटचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा आणि रमनदीप सिंह हे चेहरे फोटोमध्ये आहेत.
हेदेखील वाचा – IND vs NZ : भारताचा संघ वानखेडेवर करणार विजयाने मालिकेचा शेवट? किवी संघाकडे 143 धावांची आघाडी
मार्को जॅन्सन आणि गेराल्ड कोएत्झी यांचा कंडिशनिंग ब्रेकनंतर 8 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मार्को यानसेन आणि गेराल्ड कोएत्झी पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन करण्यास तयार आहेत. दोन्ही खेळाडू क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत T20 चॅलेंज स्पर्धेचा भाग होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 8 नोव्हेंबरला डर्बन, 10 नोव्हेंबरला गकेबेहारा, 13 नोव्हेंबरला सेंच्युरियन आणि 15 नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये चार T20 सामने होणार आहेत. ४ नोव्हेंबरला डर्बनमध्ये संघ जमणार आहे. कर्णधार एडन मार्कराम, महाराज, रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स सध्या बांगलादेशमध्ये कसोटी मालिका खेळत आहेत. हे खेळाडू ६ नोव्हेंबरला संघात सामील होतील.
हेदेखील वाचा – IND VS NZ : फलंदाजी करताय की टाईमपास? टीम इंडियाने गमावले दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट
हेड टू हेड आकडेवारी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 मध्ये एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. या 27 सामन्यांपैकी भारताने 15 तर दक्षिण आफ्रिकेने 11 वेळा विजय मिळवला आहे. 1 सामना कोणत्याही निकालाशिवाय राहिला आहे. भारतीय संघ आघाडीवर आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी T20 मालिका कोणता संघ जिंकतो हे पाहणे बाकी आहे.
भारतीय संघ T20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, विजयकुमार वैश्य, आवेश खान आणि यश दयाल.
दक्षिण आफ्रिका T20 संघ
एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन रिकेल्टन, एंडिले सिमेलेन, ट्राय सिमेलन, एंकाबा पीटर.