फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिनी पहिला सेशनमध्ये भारताच्या संघाने पहिला विकेट गमावला आहे. या सामन्यामध्ये मागील सामन्यात शतक झळकावणारा के एल राहुल हा स्वस्तात बाद झाला. राहुलने पहिल्या इनिंगमध्ये 38 धावा करून बाद झाला. तर सध्या क्रिजवर यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे फलंदाजी करत आहेत. यामध्ये भारताचा यूवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने कमालीची खेळी दाखवली आहे. साई सुदर्शन याचा मागील काही सामन्यामध्ये चांगला रेकाॅर्ड राहिला नाही.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने एक मोठा टप्पा गाठला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या. वयाच्या २३ व्या वर्षी हा विक्रम करणारा तो सहावा भारतीय ठरला. यासह, त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे, जरी धावांच्या बाबतीत त्याच्या आणि सचिन आणि कोहलीमध्ये खूप मोठे अंतर आहे.
That will be Lunch on Day 1️⃣ Yashasvi Jaiswal and Sai Sudharsan end the session with 94/1 on the board 👍 Scorecard ▶ https://t.co/GYLslRzj4G#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @ybj_19 | @klrahul pic.twitter.com/0xuAKIIIP9 — BCCI (@BCCI) October 10, 2025
जयस्वालने आतापर्यंत कसोटीत २२०० पेक्षा जास्त, एकदिवसीय सामन्यात १५ आणि टी-२० मध्ये ७२३ धावा केल्या आहेत. “क्रिकेटचा देव” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर २३ व्या वर्षी एका भारतीय खेळाडूने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या काळात मास्टर ब्लास्टरने ८,६९६ धावा केल्या आहेत, तर विराट कोहली ५,०५२ धावांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत युवराज सिंग, सुरेश रैना आणि रवी शास्त्री सारख्या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे.
८६९६ – सचिन तेंडुलकर
५०५२ – विराट कोहली
३८५३ – युवराज सिंग
३३५० – सुरेश रैना
३२२४ – रवी शास्त्री
३००० – यशस्वी जयस्वाल
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने दुपारच्या जेवणाच्या वेळी ९४ धावा केल्या, त्यापैकी जयस्वालने ४० धावा केल्या आणि तो वृत्त लिहिण्याच्या वेळी क्रीजवरच राहिला. पहिल्या सत्रात भारताला एकमेव धक्का केएल राहुलच्या रूपात लागला, जो ३८ धावांवर बाद झाला. जयस्वालला आता केएल राहुलची साथ मिळत आहे.