फोटो सौजन्य - बीसीसीआय
Yashasvi Jaiswal’s century : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे. भारताच्या संघासाठी त्याने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे, शतक झळकावून तो अजूनही टीम इंडियासाठी फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये देखील यशस्वी जयस्वाल यांनी चांगली कामगिरी केली होती पण तो त्याची कामगिरी सातत्याने चांगले ठेवू शकला नव्हता.
मागील सामन्यामध्ये त्याने चांगल्या दोन्हींनी मध्ये खेळी खेळल्या होत्या. भारतीय संघाच्या दुसऱ्या सामन्याच्या आतापर्यतच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने एक विकेट गमावला आहे. यामध्ये टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने त्याची विकेट गमावली. सध्या भारतीय संघासाठी यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे दोघे फलंदाजी करत आहेत. यशस्वी जयस्वालने जुलै २०२३ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने भारतीय फलंदाजी संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून स्वतःला लवकरच स्थापित केले.
📸📸 A 💯 to remember 😍 Rate Yashasvi Jaiswal’s innings so far 👇 Updates ▶ https://t.co/GYLslRyLf8#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @ybj_19 pic.twitter.com/3LY101kuna — BCCI (@BCCI) October 10, 2025
जयस्वालच्या पदार्पणापासून भारतीय सलामीवीरांनी एकूण १३ कसोटी शतके झळकावली आहेत यावरून याचा अंदाज येतो. जयस्वालने यापैकी सात शतके झळकावली आहेत, तर इतर सलामीवीरांनी एकत्रितपणे सहा शतके झळकावली आहेत.दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेला कसोटी सामना हा जयस्वालच्या कारकिर्दीतील २५ वा कसोटी सामना आहे.
त्याच्या नावावर २००० पेक्षा जास्त कसोटी धावा आहेत आणि त्याची सरासरी ५० च्या जवळपास आहे. जयस्वालने आतापर्यंत ४७ कसोटी डावांमध्ये सात शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. शुक्रवारी सकाळी, भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी ५८ धावांची सलामी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. राहुल ३८ धावांवर बाद झाला, त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारला. वॉरिकनच्या चेंडूवर इमलाचने त्याला यष्टीचीत केले.
सामन्यात झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉला मिळाले या संघात स्थान! वाचा सविस्तर
केएल राहुल बाद झाल्यानंतर साई सुदर्शन फलंदाजीसाठी आला. जयस्वाल आणि सुदर्शन यांनी भारतीय डाव सावरला आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अडचणीत आणले. साई सुदर्शननेही आपले अर्धशतक पूर्ण केले, त्याने १० चौकार मारले. अहमदाबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा डाव आणि १४० धावांनी मोठा पराभव केला. सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. दिल्ली कसोटी जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे.