एडिलेड : टी-२० वर्ल्डकपमधील (T-20 world cup) आज भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील आजचा चौथा सामना आहे. मागील दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पाच विकेटसनी पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघावर विजय मिळवले आहेत. तर बांग्लादेशनेही दोन विजय मिळवले आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना गमवावा लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर १२ मधील चौथा सामना आज खेळणार आहेत.
[read_also content=”माजी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत https://www.navarashtra.com/india/video-call-from-naked-young-woman-to-bjp-mla-filed-a-complaint-with-the-police-nrrd-341182.html”]
कोहलीचा ‘विराट’ विक्रम…
दरम्यान, भारताची सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. तीन सामन्यात अपयशी ठरलेला के एल राहुलला या सामन्यात फॉर्म गवसला. राहुलने या सामन्यात ३२ चेंडूत २० धावा केल्या. यात त्याने तीन चौकार व चार शानदार षटकार ठोकले. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त दोन धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रंमाकावर आलेल्या विराट कोहलीने विक्रम केला. कोहलीच्या पहिल्या ३ सामन्यांमध्ये एकूण १५६6 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात किंग कोहली (Virat Kohli) धुवांधार अर्थशतकी खेळी खेळली. फक्त ३८ चेंडूत कोहलीने ५० धावा केल्या. तसेच कोहलीच्या आजच्या खेळीच्या जोरावर विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. हा विक्रम किंग कोहलीने मोडला आहे. विराट कोहलीने जयवर्धनेच्या १०१६ धावांचा आकडा पार केला आहे. कोहलीने ४४ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली.
भारताचे १८५ धावांचे आव्हान
के एल राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीस सूर्यकुमार यादव आला. सूर्यकुमारने छोटीशी खेळी करत १६ चेंडूत ३० धावांचे खेळी केली. यात त्याने ४ चौकार मारले. तर हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक व अक्षर पटेल झटपट बाद झाले. अश्विनेने ६ चेंडूत १३ धावा काढत कोहलीला चांगली साथ दिली. भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले आहे. बांग्लादेशकडून हसन मोहम्मद याने तीन विकेट घेतले तर, शाकिब हसन याने दोन विकेट घेतल्या. दरम्यान, आज जिंकणारा संघच सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकणार असून दुसऱ्या संघाचा प्रवास अत्यंत खडतर होईल. आज विजय मिळवणारा संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचणार आहे. झिम्बाब्वे ( ३), पाकिस्तान ( २) व नेदरलँड्स ( २) हे गुणतालिकेत शर्यतीत आहेत, परंतु त्यांची शक्यता फार कमीच आहे. ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारत व बांगलादेश यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ असा आहे.