फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय महिला संघ काही दिवसातच एकदिवसीय विश्वचषक घेताना दिसणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक लवकरच सुरू होणार आहे त्याआधी भारताचा महिला संघ हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाआधी भारतीय संघाची मालिकाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवली जाणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा पहिला सामना हा 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाबमधील महाराजा यादविंद्र क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये होणाऱ्या सामन्याची लाईव्ह स्ट्रिंमिग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात येणारा मालकीचा पहिला सामना हा 14 सप्टेंबर रोजी खेळायला जाणार आहे. तर दुसरा सामना हा 17 सप्टेंबर रोजी होणार आहे तर मालिकेचा शेवटचा सामना हा 20 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. तीनही सामने हे पंजाबच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. हे सामने भारतीय वेळेनुसार १.३० मिनिटांनी सुरू होणार आहेत तर सामन्याच्या अर्ध्या तासा आधी दोन्ही कर्णधार नाणेफेक साठी येतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. या चॅनेलवर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहाॅटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
Before the World Cup, the battle begins at home! 🇮🇳🔥
Harmanpreet Kaur & Team India gear up to face Australia in a 3-match ODI series – the perfect prep before the big stage! 💙⚡
Are you ready to rally behind the Women in Blue? 🙌#INDvAUS, 1st ODI 👉 SUN, SEP 14, 1 PM on… pic.twitter.com/DGasAT1CpL
— Star Sports (@StarSportsIndia) September 11, 2025
भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे कारण विश्वचषकाआधी टीम इंडियाला या मालिकेमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्याचे विशेष लक्ष असणार आहे. भारतामध्ये विश्वचषक होत असल्यामुळे भारतीय समर्थकांची महिला संघाला कोणतीही कमी अनुभवायला मिळणार नाही. जास्तीत जास्त प्रेक्षक मैदानावर यावे म्हणून विश्वचषकाचे तिकीट देखील फारच स्वस्त ठेवले आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (विकेटकीपर), क्रांती गौड, सायली सतघरे, राधा भवानी, यौगिक यादव, यवतमान राणा