फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी सामना : चॅम्पियन ट्रॉफीला फक्त ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. हा सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहते तर उत्सुक आहेतच पण त्याचबरोबर खेळणारे संघातील सर्व खेळाडू सुद्धा प्रचंड उत्सुक आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा उपकर्णधार सलमान अली आगा याने या सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.
उपकर्णधार सलमान अली म्हणाला की त्याच्या संघासाठी, कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध जिंकण्यापेक्षा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, जर त्यांच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नाही तर भारताला हरवण्यात काही अर्थ राहणार नाही.
पीसीबी पॉडकास्टवर बोलताना सलमान म्हणाला की, भारताकडून हरणे आणि नंतर जेतेपद जिंकणे ही एक मोठी कामगिरी असणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा गतविजेता आहे, त्यांनी शेवटचा ट्रॉफी २०१७ मध्ये जिंकला होता. आगा पुढे म्हणाले, ‘पाकिस्तान-भारत सामना हा सर्वात मोठा आहे, पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे त्याहूनही महत्त्वाचे आहे. जर आपण भारताला हरवले पण स्पर्धा जिंकली नाही, तर त्या विजयाचे काही महत्त्व राहणार नाही. तथापि, जर आपण भारताकडून हरलो पण ट्रॉफी जिंकली तर ती एक मोठी कामगिरी असेल. आमचे लक्ष्य चांगली कामगिरी करणे आणि ही मोठी स्पर्धा जिंकणे आहे.
Salman ali agha said “This will be my first ICC tournament, and the excitement among the fans is huge. I’ve imagined lifting the trophy in front of my home crowd in Lahore, and that would be the best moment of my career” pic.twitter.com/A04vTJFBju
— junaiz (@dhillow_) February 15, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये सह-यजमान पाकिस्तान स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना करेल. संपूर्ण स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जात आहे, जिथे भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. कारण भारत या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास तयार नव्हता. भारताने शेवटचा २००८ मध्ये शेजारील देशाचा दौरा केला होता, त्यानंतर राजकीय तणावामुळे दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतात. आघा म्हणाला की लाहोरमध्ये त्याच्या घरच्या प्रेक्षकांसमोर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे त्याच्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे असेल.
तो म्हणाला, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मी उत्साहित आहे आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करत आहे हे विशेष आहे. लाहोरचा रहिवासी म्हणून, माझ्या गावी ट्रॉफी उचलणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असेल. पाकिस्तान संघात स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे.