पर्थ : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा तिसरा सामना आहे. मागील रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने 160 धावांची आव्हान पार करताना 6 गडी गमावत ऐतिहासिक विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय ‘किंग कोहली’ विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला, आणि विजयश्री खेचून आणली. त्यानंतर नेदरलॅन्ड बरोबर दुसऱ्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. त्यानंतर आज भारताची बलाढ्य द. आफ्रिकेबरोबर लढत होत आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड असणार आहे. पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे आतापर्यंत जरी भारतीय संघात बदल झाले नसले तरी यावेळी मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान, भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे मागील दोन सामन्यात अपयशी ठरली आहे, त्यामुळं राहुलच्या ऐवजी पंतचा समावेश होण्याची शक्यता आहे.
[read_also content=”शिंदे-फडणवीस सरकारने आतापर्यंत मविआमधील ‘या नेत्यांची’ काढली सुरक्षा https://www.navarashtra.com/maharashtra/sinde-fadnavis-government-has-so-far-removed-the-security-leaders-from-mva-340338.html”]
दरम्यान, आजची लढत सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाचे चित्र स्पष्ट करणार आहे. भारतीय संघ आज विजय मिळवताच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. दुसरीकडे गोलंदाजीमध्ये फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी दीपक हुडाला संधी मिळू शकते. या सामन्यात हार्दिक पांड्या फिट नसेल तर त्याच्या जागी अन्य खेळाडूला संधी मिळू शकते. शनिवारी पर्थमध्ये चांगला पाऊस पडला आहे, त्यामुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. पर्थची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजासांठी पोषक असेल आणि त्यांना हवामानाचीही चांगली साथ मिळू शकते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात गोलंदाजांना मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. रविवारी पर्थमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात, असं हवामान खात्याने म्हटले आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरु होणार आहे, स्टार स्पोर्टसवर लाईव्ह सामना पाहू शकता.
भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ
डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टियन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, अॅनरिक नोरखिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.