भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी 20 सिरीज (फोटो- ians)
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या टी-२० सिरिजमधील दुसरा सामना 25 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना हरारे क्रिकेट स्टेडियवर खेळवला जाणार आहे. तर श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणउण आपला पहिला विजय नोंदवला आहे. त्याच्या नेतृत्वात 7 सामने खेळले गेले. त्यातील 6 सामने तो पराभूत झाला होता.
पुढील दोन्ही सामने 25 आणि 26 जुलै रोजी खेळवले जाणार आहेत. शनिवारी आणि रविवारी हे सामने सलगपणे खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाने पुढील सामना जिंकल्यास भारत मालिका जिंकणार आहे. तिसरा सामना देखील भारताने जिंकल्यावर भारतीय संघ झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होणार आहेत. तसेच चार वाजता टॉस होणार आहे.
आयर्लंड आणि इंग्लंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाचे मनोबल तुटले होते. मात्र विजय मिळाल्यामुळे थोडासा का होईना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ जिंकण्याच्या दृष्टीनेच मैदानात उतरताना दिसणार आहे. तसेच अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी सलामीला खेळणार आहेत. वैभव सूर्यवंशीने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह.
क्रिकेटविश्व हादरलं! ‘बेबी बॉस’ Vaibhav Suryavanshi ने झिम्बाब्वेला केले उद्ध्वस्त; अर्धशतक अन्…
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.






