सिडनी : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत आणि नेदरलँड (Netherlands) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा दुसरा सामना आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने 160 धावांची आव्हान पार करताना सहा गडी गमावले होते. पाकिस्तानच्या विजयाने भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. पाकिस्तानच्या विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय किंग कोहली विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला. आणि विजयश्री खेचून आणली. आज भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी डावाची सुरुवात केली. पण तिसऱ्याच षटकाचा चौथा चेंडू भारताला पहिला धक्का बसला आहे, केएल राहुल LBW आउट झाला. त्यामुळं भारताची सुरुवात खराब झाली. सध्या दहा षटकानंतर भारताने एक गडी गमावत ६७ धावा केल्या आहेत.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्व्र कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग