भारत – अफगणिस्तान कसोटी (फोटो- सोशल मीडिया)
भारत – अफगणिस्तान कसोटीचा पाहिला दिवस समाप्त
कर्णधार शुभमन गिल अन् केएल राहुलचे शतक
पहिल्या दिवशी भारताचा स्कोअर – 368/3
IND Vs AFG Day 1 Stump Off: आज न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथील क्रिकेट स्टेडियमवर भारत – अफगणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 3 विकेट्स गमावत 368 रन्स केल्या आहेत. यामध्ये कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली.
भारतीय संघाची फलंदाजी
भारतीय संघाची सुरुवात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने केली. दोघांनी दवाची चांगली सुरुवात केली. मात्र यशस्वी जयस्वाल 24 रन्स करून आउट झाला. त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शनने भारतासाठी मोठी भागीदारी रचली. साई सुदर्शन मोठा फटका मारण्याच्या नादात आउट झाला. त्याने शानदार 81 रन्सची खेळी केली. त्यानंतर राहुलने खणखणीत शकत लगावले. मात्र तोही मोठा फटका मारण्याच्या नादात 100 रन्सवर आउट झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंतने डाव सावरला. कर्णधार शुभमनने आपल्या होम ग्राऊंडवर शानदार शतक झळकवले. तर नुकतेच उपकर्णधारपद काढून घेतलेल्या ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी केली आहे. भारताने पहिल्या दिवहसी 3 विकेट्स गमावून 368 रन्स केल्या आहेत.
IND vs AFG: IPL चा फ्लॉप शो टेस्ट क्रिकेटमध्येही चालू, Yashasvi Jaiswal पुन्हा अपयशी
अफगणिस्तान संघाची गोलंदाजी
आजच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी अफगणिस्तानच्या गोलंदाजांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. भारतीय फलंदाजांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. अफगणिस्तानकडून सलीम साफीने यशस्वीला आउट केले. तर झियाउर रहमान शरीफीने केएल राहुलला 100 रन्सवर आउट केले. तर सलीम साफीने साई सुदर्शनची विकेट घेतली.
केएल राहुलसोबत नेमके घडले काय?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर एक मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 11 व्या ओव्हर्समधील गोष्ट आहे. अफगाणिस्तानचा गोलंदाज जियाउर रहमान शारीफी हा ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याच्या एका बॉलवर केएल राहुलने बॅकफुटला जाऊन कट शॉट मरण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बारीकसा बॅटला लागून विकेट किपरकडे गेला.
IND vs AFG: IPL चा फ्लॉप शो टेस्ट क्रिकेटमध्येही चालू, Yashasvi Jaiswal पुन्हा अपयशी
त्यानंतर जियाउर रहमान शारीफी आणि अन्य खेळाडूंनी जोरदार अपील केले. मात्र ऑन-फील्ड अंपायरने राहुलला ‘नॉट-आऊट’ घोषित केले. स्लिपमध्ये उभा असलेला रहमानुल्लाह गुरबाज पूर्णपणे ठाम होता की चेंडू बॅटला लागला आहे. त्याने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला डीआरएस घेण्यासाठी सांगितले. मात्र विकेट किपरने आवाज न आल्याचे सांगितल्यामुळे डीआरएस घेतला नाही आणि इथेच मोठी चूक झाली. खरे तर नन्यत्र जेव्हा त्याचा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा केएल राहुल आउट असल्याचे दिसून येत होते.






