फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
Suryakumar Yadav on Rohit Sharma Fitness : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. लीग सामन्यात भारताच्या संघाने न्यूझीलंडचा पराभव केला होता आता त्याच मैदानावर पुन्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहेत. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत . त्याने रोहित शर्माच्या तंदुरुस्तीचे आणि अलिकडेच कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात कोण असतील पंच आणि सामनाधिकारी? वाचा संपूर्ण माहिती
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवारी ९ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. २००० मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते, जिथे न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. दुसरीकडे, भारतीय संघ २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक आणि २०२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या पराभवाचा बदला घेऊ इच्छितो.
सोशल मीडियावर आता एएनआयने सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी एएनआयशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “भारत खूप चांगले खेळत आहे. जर त्यांनी चांगली कामगिरी सुरू ठेवली तर अंतिम सामना इतर कोणत्याही सामन्यासारखाच होईल. मला सर्वांनी चांगले खेळावे असे वाटते संपूर्ण संघ नंबर १ ते १५ आणि सपोर्ट स्टाफ सुद्धा.”
#WATCH | Mumbai: On India vs New Zealand Champions Trophy 2025 final match on March 9, Indian batter Suryakumar Yadav says, “I have already said that we are playing good cricket, if we play the same cricket, then the final is just another game…”
On Rohit Sharma’s fitness row,… pic.twitter.com/hHUszXNQMM
— ANI (@ANI) March 6, 2025
अलिकडेच काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहितच्या फिटनेसबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांनी कॅप्टन रोहित शर्मा म्हटले होते की तो जाड आहे आणि तो आतापर्यंतचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार आहे. यावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, “कर्णधार म्हणून त्यांनी संघाला चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत नेले आहे. देशासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जर कोणी १५-२० वर्षे असे खेळत असेल तर ती खरोखरच मोठी गोष्ट आहे. फ्रँचायझी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो किती मेहनत घेतो हे मी त्याला जवळून पाहिले आहे. तो खूप मेहनती आहे, मी त्याला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देतो.”