केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय महिला संघाचा (Indian women team) उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या सामन्यात पाच धावांनी निसटता पराभव झाला आहे, त्यामुळं पुन्हा एकदा भारतीय महिला संघाचे वल्र्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने आपली विजयी माेहीम कायम ठेवताना गुरुवारी महिलांच्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाचा 5 धावांनी पराभव केला.
कांगारुंची सातव्यांदा अंतिम फेरीत…
दरम्यान पहिल्यांदा ऑस्ट्रेयाने फलंदाजी करत 173 धवांचा डोंगर उभा केला. तसेच कांगारुंनी सातव्यांदा विश्वचषकातील फायनल गाठली. बेथ मुनी (54) आणि लॅनिंगच्या (नाबाद 49) शानदार खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे टार्गेट ठेवले. क्षेत्ररक्षण करताना भारताने खराब कामगिरी केली. झेल सोडले, तसेच खराब क्षेत्ररक्षणामुळं अवांतर धावा दिल्या गेल्या यामुळं कांगारुंना मोठी धावसंख्या उभारण्यात आली.
भारताचा निसटता पराभव…
विजयासाठी 173 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या विजयासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (52), जेमिमा रॉड्रिग्ज (43) आणि दीप्ती शर्माने (नाबाद 20) एकाकी झुंज दिली. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. पण अखेरपर्यंत भारताने जिंकण्यासाठी झुंज व संघर्ष केला. झटपट धावा काढण्याचा नादात भारताच्या विकेट गेल्या. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर (52), जेमिमा रॉड्रिग्ज (43) यांच्या भागिदारीमुळं भारताला जिंकण्याचा आशा जागृत झाल्या. पण शेवटी भारतीय संघाला निर्धारित षटकांत 8 गडी गमावत 167 धावांपर्यंत मजल मारता आली. पराभवाने भारतीय संघाला पॅकअप करावे लागले. यामुळे भारतीय महिला संघाचे पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.
रविवारी अंतिम सामना…
कांगारुंनी सातव्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. येत्या रविवारी वर्ल्डकपची फायनल होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने फायनल गाठली. या टीमचा अंतिम सामना आता इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.






