फोटो सौजन्य - X
वैभव सुर्यवंशी – प्रीती झिंटा : पंजाब किंग्सचा सामना 18 मे रोजी राजस्थान राॅयल्स यांच्याविरूद्ध पार पडला होता. या सामन्यात पंजाबच्या संघाने राजस्थान राॅयल्सच्या संघाला 10 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात वैभव सुर्यवंशी याने कमालीची खेळी खेळली. सोशल मिडीयावर अनेक एआय व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये राजकारणी व्यक्तिमत्व त्याचबरोबर अभिनेते याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. पंजाब किंग्स आणि राजस्थान राॅयल्स या सामन्यानंतर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अलिकडेच, बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाचा राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर प्रीती झिंटा रागावताना दिसत आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एक सामना खेळला गेला. या सामन्यानंतर प्रीती झिंटा राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंशी बोलताना आणि हस्तांदोलन करताना दिसली, त्यादरम्यान प्रीती झिंटा यांनी वैभव सूर्यवंशीशीही हस्तांदोलन केले.
3386
ANALYSIS: Fake FACT: Digitally manipulated images allegedly showing cricketer Vaibhav Suryavanshi hugging Bollywood actress Preity Zinta are being circulated on social media, with many users and media outlets falsely claiming them to be authentic. (1/3) pic.twitter.com/OpIZZ2ImEr — D-Intent Data (@dintentdata) May 20, 2025
काही लोकांनी या व्हिडिओमध्ये छेडछाड केली आणि तो सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट केला, जो नंतर व्हायरल झाला. काही लोकांनी व्हिडिओमध्ये छेडछाड केली आणि प्रीती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी एकमेकांना मिठी मारताना दाखवले. या बनावट व्हिडिओवर संतापलेल्या प्रीती झिंटाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, “हे फोटो मॉर्फ केलेले आणि पूर्णपणे बनावट आहेत. मला आश्चर्य वाटते की न्यूज चॅनेल देखील असे बनावट आणि मॉर्फ केलेले फोटो दाखवून बातम्या देत आहेत.”
This is a morphed image and fake news. Am so surprised now news channels are also using morphed images and featuring them as news items ! — Preity G Zinta (@realpreityzinta) May 20, 2025
सामन्यानंतरचा मूळ व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. ज्यामध्ये प्रीती प्रथम यशस्वी जयस्वालला भेटते, त्यानंतर ती तिच्या टीमचा खेळाडू शशांक सिंगकडे जाते आणि तिला वैभव सूर्यवंशीला भेटायचे आहे असे सांगते. त्यानंतर प्रिती झिंटा वैभव सूर्यवंशीला भेटते आणि त्याच्याशी बोलते. तथापि, संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रीती झिंटा कुठेही वैभव सूर्यवंशीला मिठी मारताना दिसली नाही.
रविवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. पंजाब किंग्जने हा सामना १० धावांनी जिंकला. सामना जिंकून पंजाब किंग्जने प्लेऑफसाठीही पात्रता मिळवली.






