IPL 2025 : विराट कोहलीला 'भीम पराक्रम' करण्याची नामी संधी; आयपीएल इतिहासात आजवर कुणालाच जमले नाही..; वाचा सविस्तर(फोटो;सोशल मीडिया)
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. तर इंडियन प्रीमियर लीग 2025 चा शेवटचा सामना 25 मे रोजी होणार आहे. 10 संघांच्या उपस्थितीत खेळवली जाणारी आयपीएलची 18 वी आवृत्ती खूपच रंगतदार होणार आहे. यासाठी, सर्व संघ सज्ज झाले आहेत. आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाते. आयपीएल 2025 दरम्यान, आरसीबीचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जो आजवर कुणालाही जमलेला नाही.
खरंतर, विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये 1000 चौकार ठोकणारा पहिला फलंदाज बनण्याची संधी आहे. 2024 पर्यंत विराटने आयपीएलमध्ये एकूण 977 चौकार लगावले आहेत. आता त्याला 1000 चौकारांचा आकडा गाठण्यासाठी फक्त 23 चौकारांची गरज आहे. विराट कोहली चौकार मारण्यात तरबेज आहे, त्यामुळे यंदा तो 1000 चौकारांचा आकडा पार करू शकतो, असे मानले जात आहे.
हेही वाचा : IPL 2025 : मूर्ती लहान कीर्ती महान! राजस्थान रॉयल्सचा 13 वर्षीय तडाखेबाज फलंदाज उडवणार गोलंदाजांची झोप…
सध्या विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममधून जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याने हे उदाहरण दिले. या स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. उपांत्य फेरीतही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकणारे अर्धशतक झळकावले होते. आयपीएलमध्येही हाच फॉर्म कायम राहिला, तर काही सामन्यांमध्ये 1000 चौकार मारण्याचा विक्रम आपण करू शकतो. शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकूण 920 चौकार लागले आहेत.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, आणि यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी
आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.