IPL 2025 : मूर्ती लहान कीर्ती महान! राजस्थान रॉयल्सचा 13 वर्षीय तडाखेबाज फलंदाज उडवणार गोलंदाजांची झोप...(फोटो:सोशल मीडिया)
IPL 2025 : क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2025च्या 18 व्या हंगामाची उत्सुकता लागून राहिली आहे. 22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. यंदा आयपीएल लिलावात अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्स संघानेही एक विक्रम केला आहे. यावर्षी राजस्थान रॉयल्सने बिहारचा रहिवासी असलेल्या वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांना खरेदी करून आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम रचला होता. खरं पहाता सध्या वैभवचे वय केवळ 13 वर्षे आहे आणि आतापर्यंत इतक्या लहान वयाचे खेळाडू आयपीएलमध्ये आलेले नाहीत.
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघाकडे नजर फिरवली तर तो थोडा कमकुवत दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, संघात जोस बटलर आणि ट्रेंट बोल्ट यांची अनुपस्थिती. गेल्या वर्षी या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला अनेक सामने एक हाती जिंकून दिलेअ आहेत. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे राजस्थानला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदा वैभव सूर्यवंशीला मैदानात उतरवून ते मोठा डाव खेळू शकतात.
हेही वाचा : NZ vs PAK 2nd T20: न्यूझीलंडकडून पाकिस्तानला पुन्हा धोबीपछाड; दुसरा T20 सामनाही टाकला खिशात..
वैभवने आतापर्यंत सर्व क्रिकेटमध्ये खेळताना तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला मैदानात उतरवले तर तो यशस्वी जैस्वालसोबत सलामीला खेळताना दिसून येण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थान रॉयल्सकडे जयस्वाल व्यतिरिक्त एकही सलामीवीर नाही. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा तो घेतो, असे वैभवबद्दल सांगितले जाते. अशा परिस्थितीत त्याला जर खेळण्याची संधी मिळाली तर त्याचा कितपत फायदा संघाला होतो? हे बघणं रंजक ठरणार आहे.
हे ऐकायला खूप मनोरंजक वाटेल की, जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा वैभव सूर्यवंशी यांचा जन्म देखील झाला नव्हता. पण 2025 मध्ये राजस्थानने त्याला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केले. सध्या वैभव इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. वैभवच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने प्रथम श्रेणीत पाच सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 100 धावा केल्या आहेत. याशिवाय वैभवने लिस्ट ए मध्ये 6 सामने खेळले आहेत. येथे त्याच्या नावावर 132 धावा जमा आहेत.