फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफीच्या मोठ्या विजयानंतर आता भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगचा नवा सिझन आणि देशाचा क्रिकेटचा उत्सव सुरु होणार आहे. यासाठी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अनेक चर्चा सुरु झाली आहे. मेगा ऑक्शन झाला आणि यामध्ये खेळाडूंवर फ्रँचायझीने करोडोंची बोली लावली. आता अनेक संघाचे कर्णधार बदलले आहेत. तर काही भारतीय सांघामधील मोठे खेळाडू देखील अनेक वेगवेगळ्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. KKR चा माजी कर्णधार श्रेयस अय्यरने संघ सोडला आहे, आयपीएल २०२५ मध्ये तो पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधार पदाची घोषणा केली.
IPL 2025 : पहिल्याच सामन्यात होणार घमासान; जिंकण्याच्या इराद्याने ‘हे’ दोन संघ उतरणार मैदानात…
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२५ साठी अजिंक्य रहाणेला त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. केकेआरचा कर्णधार होण्यासाठी व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण यांची नावेही चर्चेत होती, परंतु संघ व्यवस्थापनाने रहाणेला पाठिंबा देत त्याच्यावर जबाबदारी सोपवली. आयपीएल २०२५ च्या लिलावात केकेआरने २३.७५ कोटी रुपये खर्च करून वेंकटेशला संघात समाविष्ट केले होते, परंतु तरीही त्याला कर्णधार बनवण्यात आले नव्हते. दरम्यान, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी व्यंकटेश अय्यरऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार का निवडण्यात आले हे स्पष्ट केले.
आयपीएल २०२५ ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेपूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवण्यामागील कारण स्पष्ट केले. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, वेंकटेशचे नाव बातम्यांमध्ये होते, परंतु संघ अनुभवी खेळाडूच्या शोधात होता आणि म्हणूनच रहाणेची अखेर निवड झाली. आयपीएल २०२५ च्या लिलावात अष्टपैलू वेंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते आणि त्याला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर १.५ कोटी रुपयांना खरेदी झालेल्या अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवण्यात आले आहे.
Make way for our (C)aptain Kolkata 🤩 💜 pic.twitter.com/LAxohFQiZP
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 11, 2025
केकेआरचे सीईओ पुढे म्हणाले की, आयपीएल ही एक अतिशय रोमांचक स्पर्धा आहे. अर्थात, आम्हाला व्यंकटेश अय्यरबद्दल खूप आदर आहे, पण त्याच वेळी [कर्णधारपद] एका तरुण खेळाडूसाठी खूपच आव्हानात्मक आहे. आपण अनेक लोकांना पुढे जाताना कर्णधारपद सांभाळणे कठीण होताना पाहिले आहे. त्यासाठी स्थिर हात आणि अनुभव आवश्यक आहे, जो अजिंक्य रहाणे सोबत घेऊन येतो असे आम्हाला वाटते.