फोटो सौजन्य - IndianPremierLeague/AB de Villiers सोशल मीडिया
AB de Villiers’ statement on IPL victory : मागील दोन सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना झाला या सामन्यांमध्ये बंगळुरूच्या संघाने त्यांच्या नव्या कर्णधारासह २२ चेंडू शिल्लक असताना ७ विकेट्स ने विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सला त्याच्या घरच्या मैदानावर १७ वर्षांनी दुसऱ्यांदा पराभूत केले. या कामगिरीने चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अशा परिस्थितीत, निवृत्त दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सला वाटते की संघाचे संतुलन मागील हंगामांपेक्षा ‘१० पट चांगले’ आहे.
शुक्रवारी चेपॉक येथे झालेल्या सामन्यात रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पाच वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. २००८ मध्ये झालेल्या पहिल्या हंगामानंतर चेन्नईमध्ये आरसीबीचा सीएसकेविरुद्धचा हा पहिलाच विजय होता. बंगळुरू फ्रँचायझीचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने त्याच्या पॉडकास्ट ‘एबी डिव्हिलियर्स ३६०’ वर म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या आयपीएल लिलावात मी आरसीबीला संतुलनाची गरज असल्याबद्दल बोललो होतो. हे गोलंदाज, फलंदाज किंवा क्षेत्ररक्षकांबद्दल नाही… ते आयपीएल संघ आणि पर्यायांमध्ये चांगले संतुलन असण्याबद्दल आहे.
डिव्हिलियर्स म्हणाला, मी भुवीला पाहिले आणि वाटले की ‘तो खेळणार नाही’ आणि तो आला. तुम्हाला हेच हवे आहे, तुम्हाला असे लोक हवे आहेत जे म्हणतील, ‘वाह, हा माणूस बदलला आहे.’ तो पहिल्या सामन्यात (केकेआर विरुद्ध) सुरुवातीच्या सामन्यातही नव्हता आणि आता ते दुसऱ्या सामन्यात दुसऱ्याच्या जागी भुवी कुमारला खेळवत आहेत. संघात तुम्हाला आवश्यक असलेला समतोल आणि खोली ही आहे. आरसीबीसाठी उत्तम सुरुवात आणि खरोखरच छान वाटते. आम्हाला असा प्रश्न पडत नाही की ‘या वर्षी आरसीबी आयपीएल जिंकेल का?’ पण मला वाटतं की ही आरसीबीची आतापर्यंतची सर्वोत्तम सुरुवात आहे, संघ छान दिसत आहे.
Top of the morning to you, 12th Man Army! ♥
Long way to go but we’re happy with the start. 🧿🙏#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/9qN6MuvSxT
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 29, 2025
आरसीबीने पहिल्या सामन्यात गतविजेत्या केकेआरचा पराभव केला होता. २००८ नंतर या दोन्ही संघांमध्ये उद्घाटन सामना खेळवण्यात आला. १७ वर्षांपूर्वी आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता. ब्रेंडन मॅक्युलमने ऐतिहासिक खेळी केली. यानंतर, १७ वर्षांनंतर, आरसीबीने चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवले. त्यांचा यंदाचा आत्मविश्वास खूपच चांगला आहे.