Asia Cup : क्रिकेटप्रेमींसाठी दु:खद बातमी; आशिया कपमध्ये खेळणार नाहीत 'हे' दोन भारतीय दिग्गज(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 : भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता तर आहेच सोबत आशिया कपचा विजेता सुद्धा आहे. त्यामुळे अशावेळी भविष्यात ही लय राखणे टीम इंडियासाठी एक आव्हानच असणार आहे. आशिया चषक 2025 चे यजमानपद याच वर्षी भारताकडे असणार आहे. भारत गतवेळचा आशिया कपचा चॅम्पियन संघ राहील आहे. यावेळीही भारतीय संघ विजेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहणारा आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षक गौतम गंभीरच्या टीम इंडियाने आतापासूनच तयारी करयाला सुरवात केली आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेच्या पूर्वीच रोहित-विराटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये हे दोन्ही स्टार खेळाडू भारताकडून खेळताना दिसणार नसल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वेळी आशिया चषक ट्रॉफी भारताच्या नावे करण्यात या दोन्ही खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अशा स्थितीत टीम इंडियामध्ये या दोन ज्येष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती ही चिंतेची बाब असणार आहे. रोहित आणि विराट कोहली आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा भाग का असणार नाहीत? यामागील कारण नेमकं काय? याबबात जाणून घेऊया.
हेही वाचा : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? जाणून घ्या टॉप 5 फलंदाज
आशिया चषक प्रथम एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आयोजित करण्यात येत होता. पण, गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आशिया चषकाचे स्वरूप बदलून T20 असे करण्यात आले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या दोन्ही खेळाडूंनी 2024 साली T20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यामुळेच विराट-रोहित आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाकडून खेळू शकणार नाहीत. यावेळी आशिया कप सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे.
हेही वाचा : होळीच्या आधी D Gukesh पोहोचला तिरुपती बालाजीला, वर्ल्ड चेस चॅम्पियनने केले मुंडण, Video Viral
यंदाच्या आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असणार आहे. कर्णधारपदाबाबत सूर्यकुमारची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळवल्या गेलेल्या एकही द्विपक्षीय मालिका त्याने गमावलेली नाही. कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच बहुराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. या संघात सूर्यकुमार व्यतिरिक्त अनेक युवा खेळाडूंचा भरणा असणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचेही संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याशिवाय अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल फलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसतील. गोलंदाजीची मुख्य जबाबदारी अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे असणार आहे. तसेच दुसरीकडे, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई सारखे खेळाडू देखील संघाचा भाग असण्याची शक्यता आहे.