राजस्थान रॉयल्सकडून रिंकू सिंहने खेचून आणली मॅच (फोटो सौजन्य - Instagram)
राजस्थानने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालने ३९ धावा केल्या. केकेआरसाठी वरुण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. सुनील नरेननेही २ बळी घेतले. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताची दमछाक झाली होती. मात्र कोलकाताचा स्टार खेळाडू रिंकू सिंहने राजस्थानच्या हातातून ही मॅच खेचून आणत कोलकातासाठी पहिल्या विजयाची नोंद केली.
ईडन गार्डन्सवरील चाहते खुष
4,4,0,6 BY RINKU SINGH IN THE 20th OVER TO FINISH THE MATCH 🫡 – The finisher of KKR is back. pic.twitter.com/qF0760YjY4 — Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2026
इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा २८ वा सामना आज, १९ एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात राजस्थानने ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. कोलकाताने १५६ धावांचे लक्ष्य १९.४ षटकांत पूर्ण केले. या हंगामातील कोलकाताचा हा पहिला विजय आहे, तर राजस्थानला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रिंकू सिंह या सामन्याचा हिरो ठरला आणि त्याची खेळी पाहून ईडन गार्डन्सवरील प्रेक्षकही खुष झाले असल्याचे दिसून आले.
रिंकू सिंगने अखेर केकेआरला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज असताना, रिंकू सिंगने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारून केकेआरचा विजय जवळजवळ निश्चित केला. त्यानंतर त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर एक शानदार षटकार ठोकून आपल्या संघासाठी सामना जिंकून दिला. राजस्थानच्या जिंकण्याच्या आशा रिंकू सिंगच्या खेळामुळे मावळल्या.
अनुकूल रॉयने दिली साथ
रिंकू सिंगच्या खेळाला अनुकूल रॉयनेही साथ दिली. एका क्षणाला कोलकाताच्या हातून ही मॅच निसटणार आहे असं वाटत असताना रिंकू आणि अनुकूलने अत्यंत संयमी खेळ करत कोलकाताला पहिला विजय मिळवून दिला. या हंगामातील कोलकाताचा हा पहिलाच विजय आहे. यामुळे चाहतेही खुष झाले आहेत.






