लखनौने जिंकली नाणेफेक, घेतला बॉलिंगचा निर्णय (फोटो सौजन्य - Instagram)
World Champion सूर्यकुमार यादवचे वाढले टेन्शन, T20 चा कॅप्टन होणार Shreyas Iyer; BCCI ची चाल
पंजाबचा विजयीरथ सुरूच
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स या हंगामात आतापर्यंत अपराजित राहिला आहे. आपल्या मागील सामन्यात त्यांनी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत केले. यामुळे पंजाब किंग्स पाच सामन्यांतून नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या सामन्यातील विजयामुळे त्यांचे अव्वल स्थान आणखी मजबूत होईल.
कोण ठरणार वरचढ?
दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी या हंगामात सातत्यपूर्ण राहिलेली नाही. संघाने काही प्रसंगी प्रभावी कामगिरी दाखवली आहे, परंतु सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. मुकुल चौधरीसारख्या खेळाडूंनी निश्चितच प्रभावित केले आहे, परंतु इतर खेळाडू चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. आपल्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध संघाला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतला कोपराला दुखापत झाली होती, पण तो पंजाब किंग्सविरुद्ध खेळत आहे ही दिलासादायक बाब आहे. पंजाब किंग्स आपली विजयी मालिका कायम ठेवतात की लखनौ सुपर जायंट्स पुनरागमन करून सामना रोमांचक बनवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
PBKS vs LSG Head To Head: पंजाबचा विजयरथ रोखणार का लखनौ? IPL मध्ये असा आहे दोन्ही टीमचा रेकॉर्ड
पंजाबचे पारडे जड
आतापर्यंत पंजाबची टीम एकही सामना हरली नाही. दरम्यान लखनौच्या टीमने कामगिरीत सातत्य दाखवलेले नाही. त्यामुळे दोन्ही संघांपैकी पंजाबच्या टीमचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय ऋषभ पंतच्या तुलनेत श्रेयस अय्यरची कामगिरी आणि त्याची कॅप्टन्सी हादेखील चर्चेचा विषय आहे. सध्या श्रेयस अय्यर हा टॉप खेळाडूंपैकी एक मानला जात असून त्याचा फॉर्मही उत्कृष्ट असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.






