ग्लेन फिलिप्स पत्रकारांवर का भडकला (फोटो सौजन्य - X.com)
सामन्यानंतर, गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करणारा ग्लेन फिलिप्स पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. ग्लेन फिलिप्स तर अंतिम ११ खेळाडूंमध्येही नव्हता. मात्र तरीही तो पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. दरम्यान पत्रकार परिषदेदरम्यान, ग्लेन फिलिप्सला एक असा प्रश्न विचारण्यात आला ज्यामुळे त्याचा राग अनावर झाला. भर पत्रकार परिषदेत ग्लेन फिलिप्स पत्रकारावरच भडकला.
गुजरात टायटन्सने हार मानली का?
फलकावर मोठी धावसंख्या पाहून त्यांच्या संघाने मानसिकरित्या हार मानली होती का, असा प्रश्न ग्लेन फिलिप्स यांना विचारण्यात आला. फिलिप्स यांना हा प्रश्न आवडला नाही. त्यांनी लगेच उत्तर दिले, “हा एक मूर्खपणाचा प्रश्न आहे. खरंच खूप मूर्खपणाचा प्रश्न आहे. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्ही असे का करू? हा खूपच वाईट प्रश्न आहे. आम्ही मैदानात उतरलो आणि आमचे सर्वस्व पणाला लावले. दुर्दैवाने, जेव्हा तुम्ही २५० धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडायला हवे. सर्व काही जुळून येईल या आशेने आम्ही मैदानात उतरलो होतो, पण तसे झाले नाही.”
ग्लेन काय म्हणाला
पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत होऊनही गुजरात टायटन्स संघ लीगच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. ते दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळतील. फिलिप्सच्या मते, मोठा पराभव संघासाठी चांगला असतो.
न्यूझीलंडचा हा अष्टपैलू खेळाडू म्हणाला, “अशा पराभवातून सावरणे कदाचित सोपे असते. जर तुम्ही एक-दोन धावांनी हरलात, तर तुम्ही त्या क्षणाचा विचार करत राहता, ‘असे किंवा तसे झाले असते तर बरे झाले असते’ असे वाटत राहते, पण जेव्हा तुम्ही विजयाच्या जवळपासही नसता, तेव्हा तुम्ही फक्त एवढेच म्हणू शकता की, ‘आज आमचा दिवस नव्हता.’ याचा अर्थ असा नाही की पुढच्या सामन्यात आमचा दिवस चांगला नसेल. अजूनही वेळ गेलेली नाही आणि त्यासाठी नक्कीच संघ पुन्हा नव्याने काम करेल आणि तो दिवस आमचा असेल”
Kagiso Rabada चा ‘रॉकस्टार’ परफॉर्मन्स! ‘हा’ रेकॉर्ड करत क्रिकेटविश्वाला केले थक्क






