SRH Vs RR Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्समध्ये चुरशीचा सामना
संध्यासकळी 7.30 वाजता चंदीगडमध्ये येणार आमनेसामने
वैभव सूर्यवंशी विरुद्ध पॅट कमिन्स रंगणार चुरस
IPL 2026 RR Vs SRH Eliminator Live Updates: आज न्यू चंदीगड स्टेडियममध्ये आयपीएल 2026 मधील महत्वाचा सामना पार पडणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये एलिमिनेटर (IPL 2026) सामना होणार आहे. दरम्यान आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात जो हरेल तो स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. तर जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. दरम्यान आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
आयपीएल २०२६ चा सर्वात मोठा आणि बाद फेरीचा पहिला ‘एलिमिनेटर’ सामना आज एसआरएच आणि राजस्थानमध्ये होणार आहे. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. मात्र आजचे पीच कोणाला साथ देणार हे पाहुयात.सध्या न्यू चंदीगडमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर समजली जाते. या ठिकाणी सामने हाय स्कोअर असे झाले आहेत. या स्टेडियमवर सर्वात मोठा स्कोअर हा 214 इतका आहे. तर प्रथम फलंदाजी करणारा संघ आज 200 ते 230 रन्सचे टार्गेट समोरच्या संघाला देऊ शकतो.
आयपीएल 2026 मध्ये चेस करणारे संघ जास्त प्रमाणात जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी खेळवण्यात आलेले सर्व सामने चेस करताना जिंकले गेले आहेत. आजच्या सामन्यात टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल यात शंका नाही. सुरुवातीच्या ६ ओव्हर्समध्ये फलंदाज मोठे फटके मारतात. मात्र त्यानंतर या ठिकाणी खेळपट्टी स्लो होऊ शकते. आज चंदीगडमध्ये तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने आज चाहत्यांना पूर्ण सामना पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.






