इशांत शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
SRH vs GT : आयपीएल 2025 चा 19 वा सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादचा पराभव केला. जीटीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गुजरात टायटन्सच्या विजय मिळवला असला तरी देखील बीसीसीआयकडून संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी इंशात शर्माला त्याच्या सामन्यातील फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच दंडाव्यतिरिक्त बीसीसीआयकडून इशांतच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जमा करण्यात आला आहे. इशांतवर कलम 2.2 अंतर्गत गुन्हा करण्याचा आरोप आहे. जे वेगवान गोलंदाज शर्माने देखील स्वीकारले आहे. इशांत शर्माने कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला असून जे मॅच रेफरीने लादले होते.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी घेतली 1996 च्या विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट! व्हिडिओ शेअर करत, म्हणाले…; पहा व्हिडिओ
आयपीएलने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, कलम 2.2 हा बीसीसीआयच्या खेळाडू आणि संघ अधिका-यांसाठीच्या आचारसंहितेचा एक भाग आहे आणि सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंगचा गैरवापर यांच्याशी संबंधित आहे. परिच्छेद 2.2 मध्ये सामान्य क्रिकेट क्रियाकलापांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कृतीचा समावेश आहे, जसे की विकेट मारणे किंवा लाथ मारणे आणि हेतुपुरस्सर, बेजाबदरीने किंवा निष्काळजीपणे जाहिरात फलक, सीमा कुंपण, ड्रेसिंग रूमचे दरवाजे, काच, खिडक्या आणि इतर फिटिंगचे नुकसान होते.
इशांतवर अशाच एका वर्तनाचा आरोप दाखल झाला आहे. त्याने नेमकी कोणती चूक केली? हे मात्र, अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा निर्णय बंधनकारक असणार आहे. त्यामुळे इशांतला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.
हेही वाचा : SHR vs GT : Washington sundar खरच आऊट होता? थर्ड अंपायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात.., पहा व्हिडिओ
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हैद्राबाद आणि गुजरात यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. सामन्यापूर्वी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने 152 धावा केल्या. इंशात शर्माची सनरायझर्स हैदराबादविरुद्धची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. इशांत शर्माने 4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या होत्या. या काळात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. मात्र, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णाच्या शानदार कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादला केवळ 152 धावातच रोखण्यात यश आले. त्यानंतर हैदराबादने दिलेले लक्ष्य गुजरात टायटन्सने ३ विकेट्स गमावून 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण करून सामना जिंकला.