फोटो सौजन्य - Disney+ Hotstar सोशल मीडिया
कोल्डप्ले – जसप्रीत बुमराह : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कमालीची कामगिरी केली होती. परंतु त्याला संघातील खेळाडूंची साथ मिळाली नाही. जसप्रीत बुमराह हा आताच्या क्रिकेट विश्वातला नंबर १ वेगवान गोलंदाज आहेत त्याचबरोबर त्याची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याला ओळखले जाते त्याच्या गोलंदाजीची कौतुक केले जाते हे भारतीय क्रिकेटसाठी खूप अभिमानाची बाब आहे.
पण सध्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे हैराण आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला पाठीला दुखापत झाली होती. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. आता त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विश्रांती घेत असताना जसप्रीत परदेशी प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिनच्या कॉन्सर्टमध्ये दिसला. कोल्डप्लेचा हा भारतातील दुसरा शो होता जो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झाला. पहिला शो मुंबईत झाला. या कॉन्सर्टमध्ये बुमराहचे जोरदार स्वागत झाले. ख्रिस मार्टिननेही लोकांसमोर उपस्थित असलेल्या बुमराहचे नाव घेतले.
The ‘game changer’ player is in the house 🔥 turning everything yellow 💛#ColdplayOnHotstar pic.twitter.com/pcXVT3l8L8
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) January 26, 2025
या ब्रिटीश बँडने बुमराहकडे खूप लक्ष दिले आणि त्याला एक गाणे देखील समर्पित केले. बुमराह ज्याप्रकारे इंग्लंडच्या फलंदाजांना सामन्यांमध्ये बाद करतो ते त्याला आवडत नाही, असेही बँड म्हणाले. मात्र, हा सगळा विनोदच होता. तो म्हणाला, “अरे जसप्रीत बुमराह, माझा अद्भुत भाऊ. क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. जेव्हा तुम्ही इंग्लंडला उद्ध्वस्त करता तेव्हा आम्हाला आनंद वाटत नाही, विकेटनंतर विकेट.”
कोल्ड प्लेने बुमराहची स्वाक्षरी केलेली कसोटी जर्सीही रंगमंचावर दाखवली. यापूर्वी कोल्ड प्लेने मुंबईत झालेल्या कॉन्सर्टमध्येही बुमराहचे नाव घेतले होते. बँडने बुमराहचा एक व्हिडिओ प्ले केला होता ज्यामध्ये तो इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करत आहे. हा व्हिडिओ २०२४ मध्ये दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेचा आहे.
याच शोमध्ये ख्रिस मार्टिनने असेही सांगितले की, त्याला बुमराहच्या वकिलाकडून कायदेशीर नोटीस मिळाली आहे कारण बँडने त्याचे नाव वापरले आहे. मार्टिनकडे एक काल्पनिक पत्र देखील होते, ते वाचून तो म्हणाला, “माफ करा, पण मला जसप्रीत बुमराहच्या वकिलाचे हे पत्र वाचावे लागेल. मला हे करावे लागेल, अन्यथा आम्हाला तुरुंगात पाठवले जाईल आणि आम्ही अहमदाबादमध्ये प्रदर्शन करणार नाही. सक्षम व्हा.” हा देखील विनोदाचा एक भाग होता, ज्याचा बुमराहने देखील खूप आनंद घेतला.
जसप्रीत बुमराह आता चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याआधी भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.