फोटो सौजन्य - Gujarat Titans/KolkataKnightRiders
Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Toss Update : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज आयपीएल २०२५ चा हा ३९ वा सामना रंगणार आहे. ईडन गार्डन्सवर आज शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे हा सीझनमध्ये पहिल्यादाच आमनेसामने असणार आहे. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यांमध्ये केकेआरने पंजाब किंग्सविरुद्ध अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. आज दोन्ही संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. गुजरातच्या संघाने मागील सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले आहे.
सध्या पॉईंट टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. गुजरातच्या संघाने आतापर्यत ७ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने आतापर्यत ७ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामने जिंकले आहेत तर ४ सामन्यात ते पराभूत झाले आहेत. सध्या केकेआरचा संघ सध्या सातव्या स्थानावर आहे.
🚨 Toss 🚨@KKRiders won the toss and elected to bowl against @gujarat_titans in Kolkata.
Updates ▶️ https://t.co/TwaiwD5D6n#TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/Rof135hqli
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2025
आजच्या सामान्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सने संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नॉरकियाला प्लेइंग ११ मधून बाहेर काढण्यात आले आहे त्याच्या जागेवर संघाचा फिरकी गोलंदाज मोईन अलीला संघामध्ये स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर आज संघाचा विकेटकीपर क्विंटन डी क्वाकला संघाबाहेर ठेवले आहे. त्याच्या जागेवर रहमाननुल्लाह गुरबाझला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. रहमाननुल्लाह गुरबाझ आज आयपीएल २०२५ चा पहिला सामना खेळत आहे. आज गुजरात टायटन्सच्या संघामध्ये वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.
सुनील नरेन,अजिंक्य रहाणे (कर्णधार), रहमाननुल्लाह गुरबाझ (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मोईन अली, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुदर्शन, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.