फोटो सौजन्य - Rajasthan Royals/KolkataKnightRiders
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स टॉस अपडेट : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आज आयपीएल २०२५ चा ५३ वा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. हा सीझनचा सहावा सामना कोलकातामध्ये खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी पहिल्या डावात गोलंदाजीचे आव्हान असणार आहे. यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांच्याकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ जवळजवळ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्याचबरोबर केकेआरच्या आशा अजूनही जिवंत आहेत.
दोन्ही संघामध्ये आज बदल करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सने आणखी एकदा मोईन अलीला संघामध्ये स्थान मिळाले आहे तर त्याचबरोबर खराब फॉर्ममध्ये असलेल्या रमनदीप सिंहवर देखील कॅप्टनने विश्वास दाखवला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये आजच्या सामन्यात नितीश राणाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे त्याच्या जागेवर कुणाल राठोडला संघामध्ये घेतले आहे. त्याचबरोबर युद्धवीर सिंह आणि वनिंदूं हंसरंगा यांना देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.
या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. संघ फक्त आतापर्यत ३ सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे तर ८ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सकडून मोठ्या धावांनी राजस्थानला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाता नाईट राइडर्ससाठी सुद्धा हा सिझन फार काही चांगला राहिला नाही संघाने फक्त आतापर्यत ४ विजय मिळवले आहेत.
🚨 Toss 🚨@KKRiders won the toss and elected to bat against @rajasthanroyals in Kolkata.
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR pic.twitter.com/7ahodqvJBI
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
कोलकाता नाईट राइडर्सचा धुव्वादार फलंदाज आंद्रे रसेल खराब फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आज त्यांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. सुनील नारायण आज पहिले फलंदाजी करणार आहे त्यामुळे आज तो जोफ्रा आर्चरचा सामना कसा करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरण हेटमायर, वनिंदूं हंसरंगा, जोफ्रा आर्चर, युद्धवीर सिंह, महिष तीक्षणा, आकाश मधवाल
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रहमानुल्लाह गुजबाज (विकेटकिपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, अंगकृष्ण रघुवंशी, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, मोईन अली, रमनदीप सिंह, वैभव अरोडा, वरूण चक्रवर्ती