भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय (फोटो- bcci )
भारताने इंग्लंड विरुद्ध पाचव्या सामन्यात रोमांचक असा विजय प्राप्त केला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत या टेस्ट सिरीजमधील शेवटच्या सामन्यात भारताने सहा धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही सिरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे. ओव्हलच्या सामन्यात भारताने मिळवलेल्या विजया त पाच महत्त्वाचे टर्निंग पॉईंट्स होते. याच कारणांमुळे भारताने इंग्लंडला पराभूत केले आहे. तर ओव्हलच्या सामन्यात भारताच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरलेली पाच कारणे आपण जाणून घेऊयात.
भारताची भेदक गोलंदाजी
जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीमध्ये मोहम्मद सिराज याने भारताची गोलंदाजी उत्तमपणे सांभाळली. शेवटच्या सामन्यात मोहम्मद सिराज याने 9 विकेट मिळवल्या. पहिल्या गावात चार आणि दुसऱ्या डावात पाच विकेट प्राप्त केल्या. प्रसिद्ध कृष्णाने देखील सिराजची चांगली साथ दिली. प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावात मिळून आठ विकेट प्राप्त केल्या. त्यामुळेच भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
फलंदाजांची चांगली खेळी
ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या डावात सर्व बाद 396 धावा केल्या. यशस्वी जयस्वालने शतकीय खेळी केली. तर आकाशदीपने अर्धशतकी खेळी करून भारताच्या डावाला आकार दिला. शेवटच्या काही ओवर्समध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकीय खेळी करून भारताला 396 धावांपर्यंत पोहोचवले.
आकाशदीपचे अर्धशतक
भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने ओव्हल टेस्टमध्ये अर्धशतकीय खेळी केली. नाईट वॉचमनच्या रूपात मैदानात आलेल्या आकाशदीपने 66 धावांची खेळी केली. त्याच्या करिअरमधील हे पहिले अर्धशतक आहे. आकाशदीपने यशस्वी जयस्वाल सोबत तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची पार्टनरशिप केली. त्यामुळेच भारत मजबूत स्थितीत पोहोचला. तसेच त्याने या सामन्यात दोन विकेट्स देखील घेतल्या.
खांदा मोडला पण आत्मविश्वास नाही! भारत जिंकला मात्र सर्वत्र चर्चा Chris Woakes ची; पहा Video
नवीन बॉल घेतला नाही
शेवटच्या सामन्यातील शेवटच्या दिवशी ८० ओवर्स पूर्ण झाल्यानंतर देखील नवीन बॉल घेतला गेला नाही. शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती. तर भारताला विजयासाठी चार विकेट्स आवश्यक होत्या. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी जुन्या चेंडूचा फायदा उचलला. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना बॅटिंग करताना अडचण निर्माण होत होती.
प्रसिद्ध कृष्णाचे जबरदस्त कमबॅक
प्रसिद्ध कृष्णाचा हा दौरा फारसा चांगला राहिला नव्हता. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात प्रसिद्ध कृष्णाला संघाच्या बाहेर बसवण्यात आले होते. मात्र पाचव्या सामन्यात त्याला संधी मिळाली. या सामन्यात त्याने जबरदस्त कम बॅक करत एकूण आठ विकेट्स पटकावल्या. दोन्ही डावात त्यांनी चार चार विकेट्स पटकावल्या. प्रसिद्ध कृष्णाने जो रूटची विकेट घेतल्याने भारत या खेळात विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकला.