फोटो सौजन्य - Lucknow Super Giants/Delhi Capitals सोशल मीडिया
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स टॉस अपडेट : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. या सामन्यांमध्ये आज अक्षर पटेल आणि रिषभ पंत आमनेसामने असणार आहेत. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा आज एकमेकांविरुद्ध लढणारा आहेत. याआधी या दोघांचा सामना झाला होता तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने हा सामना १ विकेटने जिंकला होता.
आजच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने एक बदल केला आहे. यामध्ये त्यांनी मोहित शर्माला आज बाहेर केले आहे आणि त्यांच्या जागी दुष्मंथा चामीरा यांना संधी देण्यात आली आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघाने कोणतेही बदल केलेले नाहीत. ऋषभ पंत म्हणाला की तो शेवटचा सामना खेळलेल्या संघासोबतच खेळेल.
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and opted to bowl first against @LucknowIPL.
Updates ▶️ https://t.co/nqIO9mb8Bs#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/cJtkQgliTi
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2025
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, तर दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने मागील सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघाचे सध्या १० गुण आहेत. पण रन रेटमुळे पॉईंट टेबलमध्ये स्थिती दोन्ही संघाची स्थिती वेगवेगळी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ या सीझनमध्ये आतापर्यत ७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ५ सामन्यात विजय मिळवला आहे आणि २ सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर लखनौचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. ८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले तर ३ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
IPL 2025 च्या शर्यतीतून हे संघ होणार बाहेर! प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक, वाचा गुणतालिकेचं गणित
आजच्या सामन्यांमध्ये रिषभ पंतच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे, त्यामुळे मागील दोन सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. तर केएल राहुल संघासाठी दमदार खेळी दाखवत आहे. लखनौ सुपर जायंट्ससाठी ट्रिस्टन स्टब्स धोकादायक ठरू शकतो. एडन मार्कराम, मिचेल मार्श या जोडीने संघाला कमालीची सुरुवात करून दिली होती.
एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव
इम्पॅक्ट प्लेयर : आयुष बदोनी, मयंक यादव, शाहबाज अहमद, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग
अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा