फोटो सौजन्य - X
बांग्लादेश एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार : बांग्लादेशचा हा टी 20 मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर होता. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत बांग्लादेशच्या संघाला पाकिस्तानने वाईट वॉश केले होते. त्याआधी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील बांगलादेश फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. आता बांग्लादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. या मालिकेत बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी आता बांगलादेश क्रिकेटच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली.
बांगलादेश क्रिकेटचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याला एकदिवसीय फॉरमॅटमधून कर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे. आता त्याच्या जागेवर मेहंदी हसन मिराज याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आता बांग्लादेशच्या तीनही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे खेळाडू कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहेत. टी 20 संघाचे कर्णधारपद हे लिटन दास याच्या हाती आहे तर कसोटी संघाची कमान ही नजमुल हुसेन शांतो याच्याकडे आहे. तर एकदिवसीय क्रिकेट संघाची जबाबदारी ही मेहंदी हसन मिराज सांभाळताना दिसणार आहे.
बांगलादेशचा संघ हा श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी संघ श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. त्यानंतर बांगलादेशचा संघ हा त्यांच्या मैदानावर भारताविरुद्ध तीन सामन्याची टी 20 मालिका आणि तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे.
🚨 Mehidy Hasan Miraz takes charge as Bangladesh’s new ODI captain, replacing Najmul Hossain Shanto. 🇧🇩 pic.twitter.com/r4hwg14P8V
— CricketGully (@thecricketgully) June 12, 2025
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात, २७ वर्षीय मेहदी म्हणाले, “बोर्डने ही जबाबदारी सोपवणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.” मार्च २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून, मेहदीने १०५ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतकांसह १,६१७ धावा केल्या आहेत आणि ११० विकेट्सही घेतल्या आहेत.
मेहदी म्हणाला, “देशाचे नेतृत्व करणे हे कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि बोर्डाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. मला या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमच्याकडे निर्भय क्रिकेट खेळण्याची प्रतिभा आणि विश्वास आहे. आम्हाला आत्मविश्वासाने कामगिरी करावी आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय खेळावे आणि देशासाठी आमचे सर्वोत्तम काम करत राहावे अशी माझी इच्छा आहे.”