महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
MI vs CSK : रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला या हंगामातील दुसऱ्या सामन्यातही हरवले. या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला होता. या विजयाने मुंबईने सलग तिसरा विजय नोंदवला. मुंबईने चेन्नईला ९ गडी राखून पराभूत केले. तत्पूर्वी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी बोलावले. रचीन रवींद्र ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर पदार्पण करणारा युवा आयुष म्हात्रे याने तडाखेदार बॅटिंग करुन चेन्नईला शानदार सुरुवात दिली. मात्र आयुषसोबत असलेल्या शेख राशिदला मुंबईच्या बॉलिंगचा खास सामना करता आला नाही.
हेही वाचा : RCB Vs PBKS : कोहली आणि पडिक्कल यांची दमदार अर्धशतके, आरसीबीकडून पंजाब किंग्जचा सात विकेट्सने पराभव..
दुसऱ्या बाजूला आयुषने १५ बॉलमध्ये २ सिक्स आणि ४ फोरसह ३२ धावा केल्या. आयुषनंतर शेख रशीदही आऊट झाला. त्यामुळे चेन्नईची ८ ओव्हरनंतर ३ आऊट ६३ अशी स्थिती झाली. त्यामुळे चेन्नई बॅकफुटवर गेली. मात्र, त्यानंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेने डाव सावरला. दोघांनीही अर्धशतक पूर्ण केले. दुबेने ३० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. दुबेचे आयपीएल कारकीर्दीतील हे १० वे अर्धशतक ठरले. दुबे-जडेजा या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७९ धावांची भागिदारी केली.
हेही वाचा : IPL 2025: गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का; शुभमन गिलला १२ लाखांचा दंड
चेन्नई सुपर किञ्जकडून मुंबईकर १७ वर्षीय आयुष म्हात्रेने मुंबईविरुद्धच आयपीएलमध्ये पदार्पण केले. अष्टपैलू आयुष म्हात्रेला आयपीएलच्या मेगा लिलावात चेन्नईने ३० लाखात खरेदी केले. आता तो चेन्नईकडून खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याआधी आयपीएलमध्ये चेन्नईकडून अभिनव मुकूल सर्वात युवा फलंदाज होता. मुकूलने वयाच्या १८ वर्षे १३९ व्या दिवशी चेन्नईकडून पहिला सामना खेळला होता. आता आयुष म्हात्रे १७ वर्षे २७८ दिवस इतके वय असताना चेन्नईकडून पदार्पण केले आहे.
आयपीएल २०२५ च्या ३७ व्या सामन्यात कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा यांच्या शानदार गोलंदाजीनंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या अर्धशतकांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जवर सात विकेट्सने मात केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने विराट कोहली (नाबाद ७३) आणि देवदत्त पडिक्कल (६१ धावा) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर सात चेंडू शिल्लक असताना तीन विकेटच्या मोबदल्यात १५९ धावा करून सहज विजय मिळवला. या विजयासह, आरसीबीने पंजाब किंग्जसह पाच संघांमध्ये सामील झाले ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. पंजाब किग्जने यापूर्वी सहा विकेटच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या होत्या.