श्रेयस अय्यर आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
RCB Vs PBKS : कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा यांच्या शानदार गोलंदाजीनंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या अर्धशतकांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकतर्फी सामन्यात पंजाब किंग्जवर सात विकेट्सने मात केली. पंजाबच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने विराट कोहली (नाबाद ७३) आणि देवदत्त पडिक्कल (६१ धावा) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर सात चेंडू शिल्लक असताना तीन विकेटच्या मोबदल्यात १५९ धावा करून सहज विजय मिळवला. या विजयासह, आरसीबीने पंजाब किंग्जसह पाच संघांमध्ये सामील झाले ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. पंजाब किग्जने यापूर्वी सहा विकेटच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या होत्या.
डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल (२/२५) आणि लेग स्पिनर सुयश (२/२६) यांच्या फिरकी गोलंदाजीमुळे पंजाबने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि त्यांच्या कोणत्याही फलंदाजाला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ३३ धावा केल्या तर शशांक सिंगने ३१ धावा करून नाबाद राहिला. जोश इंग्लिस (२९), मार्को जॅन्सन (नाबाद २५) आणि प्रियांश आर्य (२२) यांनीही उपयुक्त खेळी केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने डावाच्या पहिल्याच षटकात फिल साल्ट (०१) चा बळी गमावला. तो अर्शदीपच्या गोलंदाजीवर
हेही वाचा : IPL 2025: गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का; शुभमन गिलला १२ लाखांचा दंड
यष्टीरक्षक इंग्लिसने झेलबाद केला. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये सलामीवीर कोहली आणि पडिक्कल यांनी संघाची धावसंख्या १ बाद ५४ पर्यंत नेली. कोहलीने झेवियर बार्टलेटच्या चेंडूवर चौकार मारला तर पडिक्कलने वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर षटकार मारला. कोहलीने हरप्रीत ब्रारचे दोन चौकारांसह स्वागत केले आणि त्यानंतर जानसेनच्या पहिल्याच षटकातही दोन चौकार मारले. पडिक्कलने आक्रमक वृत्ती दाखवली आणि युजवेंद्र चहल आणि बार्टलेटवर षटकार मारले. त्याने चहलच्या चेंडूवर धाव घेऊन ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
तथापि, पुढच्याच षटकात, हरप्रीतच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना पडिकल लौंग ऑन बाउंड्रीवर निहाल वधेराने झेल दिला. कोहलीने ४३ चेंडूत जॅन्सेनच्या चेंडूवर धाव घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले. आरसीबीला शेवटच्या तीन षटकांत १४ धावांची आवश्यकता होती आणि जितेश शर्माने (नाबाद ११) वधेराच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा : PSL मध्ये पठ्ठ्याचं मन रमेना; सामन्यादरम्यान मोबाईलवर पाहू लागला आयपीएल, VIDEO तुफान व्हायरल
तत्पूर्वी, पाटीदार संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी पंजाबला वेगवान सुरुवात करून दिली. प्रभसिमरनने यश दयालचे चौकार मारून स्वागत केले तर प्रियांशने त्याच षटकात एक षटकार आणि एक चौकार मारला. प्रभसिमरनने भुवनेश्वरवर तीन चौकारही मारले. प्रियांशने जोश हेझलवूडच्या चेंडूवर दोन चौकार मारले पण कृणालच्या चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न करताना त्याने चेंडू हवेत फेकला आणि टिम डेव्हिडने त्याचा सोपा झेल घेतला. पॉवर प्लेमध्ये प्रभसिमरनने हेझलवूडच्या चेंडूवर षटकार मारून संघाला १ बाद ६२ धावांपर्यंत पोहोचवले. पण नंतर १५७ धावाच हा संघ करु शकला, पंजाबला शेवटच्या पाच षटकांत फक्त ३८ धावा करता आल्या.