फोटो सौजन्य : IndianPremierLeague
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स पहिल्या डावाचा अहवाल : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये आयपीएल 2025 चा या दोन्ही संघांचा शेवटचा साखळी सामना सुरू आहे. आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ पहिल्या स्थानावर विराजमान होणार आहे. या दोन्ही संघांची लढत ही पहिल्या स्थानासाठी सुरू आहे या सामन्यात पहिले नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यरणे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करत मुंबईच्या संघाने संथ गतीने सुरुवात केली. या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत पंजाब किंग्ससमोर 185 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर आहेत तर पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर वाचा. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रायन रिकल्टन या आजच्या सामन्यात 20 चेंडुमध्ये 27 धावा केल्या. रोहित शर्मा याने या सामन्यात संथ गतीने धावा केल्या. त्याने 21 चेंडू खेळले यामध्ये त्याने 24 धावा केल्या, यात 1 षटकार आणि 2 चौकार मारले. तिळक वर्मा आज आणखी एकदा फेल ठरला, त्याने 4 चेंडू खेळले आणि विकेट गमावली.
विल जॅक्स याने या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, पण या सामन्यात त्याने फक्त 17 धावा केल्या. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने आजच्या सामन्यात 15 चेंडुमध्ये 26 धावा केल्या यामध्ये त्याने 2 षटकार 2 चौकार मारले. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव यांनी आणखी एक अर्धशतक झळकावले त्याने 39 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या यामध्ये दोन षटकार आणि सहा चौकार मारले.
Innings break!#PBKS keep #MI to 184/7 in a topsy turvy first half of this exciting contest 🔥
Folks, who will seal a spot in Qualifier 1⃣ tonight? 🤔
Updates ▶ https://t.co/Dsw52HOtga#TATAIPL | #PBKSvMI | @PunjabKingsIPL | @mipaltan pic.twitter.com/rYoPCnuyBJ
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
पंजाब किंग्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर आजच्या सामन्यात वैशांक कुमार याने आजच्या सामन्यात २ विकेट्स घेणार आहेत. यामध्ये त्याने तिलक वर्मा आणि विल जॅक्स या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर मार्को जॉन्सन याने देखील संगणक दोन विकेट्स मिळवून दिले. रायन रिकलटन आणि हार्दिक पांड्या या दोघांना पवेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंह यांच्या हा ती शेवटच्या ओव्हर मध्ये एक विकेट लागला त्याच बरोबर हरप्रीत ब्रार याने देखील संघाला एक विकेट मिळवून दिला.