फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad सोशल मीडिया
Saliva ban lifted in IPL 2025 : आयपीएल २०२५ चा नव्या सिझनची सुरुवात होणार आहे. यामध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना होणार आहे. मागील काही वर्षांआधी आयसीसीने बॉलला लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चेंडूला मऊ करण्यात गोलंदाजांना कठीण जात होते, पण मग अशावेळी मैदानामध्ये खेळाडू त्यांचा घाम चेंडूला लावत होते. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवी घोषणा केली आहे, त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना या गोष्टीचा आनंद होणार आहे.
RCB vs KKR : कधी आणि कुठे पाहता येणार IPL 2025 चा पहिला सामना, वाचा Live Streaming ची संपूर्ण माहिती
गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगच्या बहुतेक कर्णधारांच्या संमतीनंतर आगामी सीझनमध्ये चेंडूवर लाळेच्या वापरावरील बंदी उठवली माहिती समोर आली आहे. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामीला गोलंदाजी करण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. यावेळी शामीने मागणी केली होती की, भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी म्हणाला होता की चेंडूवर लाळ लावण्याची गरज आहे अन्यथा तो पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूने असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा व्हर्नन फिलँडर आणि न्यूझीलंडचा टिम साउथी यांनीही याला पाठिंबा दिला. मुंबईत झालेल्या कर्णधारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘लाळेवरील बंदी उठवण्यात आली आहे त्यामुळे आता गोलंदाजांना मोठा फायदा होणार आहे. बहुतेक कर्णधार या निर्णयाच्या बाजूने होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोविड-१९ साथीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्याच्या जुन्या पद्धतीवर बंदी घातली होती आणि नंतर जागतिक संघटनेने २०२२ मध्ये ही बंदी कायमची केली. बीसीसीआयने आधीच यावर अंतर्गत चर्चा केली होती आणि कर्णधारांना निर्णय घ्यायचा होता, म्हणून आज कर्णधारांनी आयपीएलच्या या सत्रात लाळेचा वापर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
कोरोना महामारीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्याच्या जुन्या पद्धतीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बंदी घातली होती. २०२२ मध्ये आयसीसीने ही बंदी कायमची केली. कोरोना साथीनंतर आयपीएलने स्पर्धेच्या खेळण्याच्या परिस्थितीतही हे निर्बंध समाविष्ट केले होते, परंतु आयपीएलची मार्गदर्शक तत्त्वे आयसीसीच्या अधिकारक्षेत्राबाहेर आहेत. जर बोर्डाला हवे असेल तर गोलंदाज चेंडूवर लाळ लावू शकतात हा नियम पुन्हा लागू केला जाऊ शकतो.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “कोरोनापूर्वी चेंडूवर लाळ लावणे सामान्य होते. आता कोरोनाचा धोका नसल्याने, आयपीएलमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी उठवण्यात काही नुकसान नाही. आम्हाला समजते की लाल चेंडूच्या क्रिकेटवर त्याचा मोठा परिणाम होतो आणि पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात गोलंदाजांनाही त्याचा थोडासा फायदा होतो. आयपीएलमध्ये याला परवानगी दिली पाहिजे. कर्णधार यावर काय निर्णय घेतो ते पाहूया.”